19 February 2020

News Flash

झोन दाखले ऑनलाइन उपलब्ध

नागरिकांना झोन दाखले मिळण्यासाठी संगणकप्रणाली, तसेच मोबाइल अ‍ॅपद्वारे देखील ते उपलब्ध होणार आहेत

(संग्रहित छायाचित्र)

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी – पीएमआरडीए) येत्या बुधवारपासून (११ सप्टेंबर) झोन दाखले ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत. झोन दाखल्यांसाठी पीएमआरडीएच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येऊ शकेल.

नागरिकांना झोन दाखले मिळण्यासाठी संगणकप्रणाली, तसेच मोबाइल अ‍ॅपद्वारे देखील ते उपलब्ध होणार आहेत. झोन दाखला प्राप्त करण्यासाठी ऑनलाइन पेमेंट सुविधा (एनईएफटी, आरटीजीएस, नेट बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड) पीएमआरडीएने केली आहे.  येत्या १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन झोन दाखले सुविधा ही पूर्णत: रोकड विरहित होणार आहे.

पीएमआरडीएकडून या सुविधेसाठी www.pmrda.gov.in  किंवा zonecertificate.

या संकेतस्थळांचा वापर करावा, असे आवाहन पीएमआरडीएकडून करण्यात आले आहे.

First Published on September 10, 2019 3:16 am

Web Title: zone online certificate available akp 94
Next Stories
1 मलेरिया व डेंग्यू उच्चाटनास प्राधान्य – हर्षवर्धन
2 दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेने लष्कर सज्ज
3 खडकवासला धरणातून चार हजार क्युसेकने विसर्ग
Just Now!
X