सनसिटी-कर्वेनगर पुलासाठी १२ गुंठे जागा महापालिके कडे

पुणे : सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने राजाराम पूल ते फनटाईम चित्रपटगृह या दरम्यानच्या प्रस्तावित उड्डाणपुलाचे भूमिपूजन होत असतानाच सनसिटी ते कर्वेनगर या उड्डाणपुलाच्या कामालाही गती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सनसिटी-कर्वेनगर या नदीवरील उड्डाणपुलासाठी १२ गुंठे जागा महापालिके ला मिळणार आहे. कर्वेनगर येथील दुधाने परिवाराने ही जागा देण्यास मान्यता दिली असून त्याबाबतची ताबेयादी करण्यात आली आहे. महापालिके ने त्याबाबतची प्रक्रियाही सुरू के ली आहे. यामुळे कर्वेनगर आणि सनसिटी परिसरातील मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे.

thane traffic jam, ghodbunder traffic jam,
ठाणे: कापूरबावडी उड्डाणपूलाच्या दुरुस्तीमुळे घोडबंदर ठप्प
Term of work of bridge over Mula river is over but the work continues
पिंपरी : मुळा नदीवरील पुलाच्या कामाची मुदत संपली तरी काम सुरूच! आता सजावटीसाठी २० कोटींचा खर्च
thane traffic
कल्याण: पत्रीपुलावर दोन तासांपासून वाहनांच्या रांगा
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी

सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी राजाराम पूल ते फनटाईम चित्रपटगृह या दरम्यान दुहेरी उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला आहे. या उड्डाणपुलाचे भूमिपूजन के ंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी (२४ सप्टेंबर) होणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या या उड्डाणपुलाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला असतानाच सनसिटी-कर्वेनगर नदीवरील उड्डाणपुलाचे कामही पुढे सरकले आहे.

सनसिटी ते कर्वेनगर भागाला जोडण्यासाठी नदीवर ३० मीटर रुंदीचा उड्डाणपूल बांधण्यास महापालिके ने दोन वर्षांपूर्वी मंजुरी दिली होती. त्यासाठीचे भूसंपादन करण्याची प्रक्रियाही महापालिके कडून राबविण्यास सुरुवात झाली. कर्वेनगर, हिंगणे या बाजूकडील दोन हजार चौरस मीटर तर सिंहगड रस्त्याकडील बाजूची १० हजार चौरस मीटर एवढी जागा त्यासाठी आवश्यक आहे. मात्र भूसंपादनाअभावी ही प्रक्रिया रखडली होती. त्यासाठी महापालिका अधिकारी, स्थानिक नगरसेवक आणि संबंधित शेतकरी यांच्यात सातत्याने बैठका होत होत्या. त्यानुसार दुधाने परिवाराने उड्डाणपुलासाठी १२ गुंठे जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात महापालिके चे नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या उपस्थितीत नगरसेविका लक्ष्मी दुधाने, कोंडीराम दुधाने, माणिकशेठ दुधाने, विजय दुधाने आणि स्वप्नील दुधाने यांच्यात बैठक झाली. त्यामध्ये ही जागा महापालिके ला देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि महापालिके ला प्राथमिक ताबेयादी करून पुढील प्रक्रिया राबविण्यास परवानगी देण्यात आली. दुधाने परिवाराने यापूर्वीही शिवणे खराडी रस्ता, प्राथमिक शाळा, ग्रंथालय, रुग्णालय आणि हरित पट्टय़ासाठी वेळोवेळी जागा दिली आहे. त्यामुळे या नियोजित उड्डाणपुलाच्या कामालाही गती मिळणार आहे.

सिंहगड रस्त्यावरील सनसिटी ते कर्वेनगर या दोन्ही उपनगरांमध्ये जाण्यासाठी अध्र्या तासाचा कालावधी लागतो. हा कालावधी नदीवरील प्रस्तावित उड्डाणपुलामुळे दहा मिनिटांचा होणार आहे. त्यामुळे दोन्ही उपनगरे जोडली जाण्याबरोबरच कर्वेनगर आणि सिंहगड रस्ता तसेच राजाराम पुलावरील वाहतुकीचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.

उड्डाणपुलाचे आज भूमिपूजन

सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते फनटाइम चित्रपटगृह या दरम्यानच्या प्रस्तावित उड्डाणपुलाचे के ंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी भूमिपूजन होणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून उड्डाणपुलाचे काम रखडले होते. उड्डाणपुलासाठी १३५ कोटींची तरतूद महापालिके ने मंजूर

के ली आहे. प्रस्तावित उड्डाणपुलाची लांबी एकू ण २.५ किलोमीटर एवढी आहे. दोन टप्प्यात उड्डाणपूल उभारण्यात येणार असून स्वारगेटहून वडगांव धायरीकडे जाणाऱ्या वाहनचालकांना कु ठेही न थांबता थेट फनटाइम चित्रपटगृहापर्यंत जाता येणार आहे. तसेच वडगांव धायरीहून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका असणार आहे. प्रस्तावित उड्डाणपुलामुळे २.७४ किलमीटर अंतराची वाहतूक थेट होणार आहे. स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांसाठी राजाराम पूल चौकात ४९५ मीटर लांबीचा आणि सिंहगडकडे जाणाऱ्या वाहनांसाठी राजाराम पूल ते फनटाइम चित्रपटगृहापर्यंत २ हजार १२० मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. दुहेरी वाहतुकीसाठी पुलाची रुंदी १६.३ मीटर आणि एके री वाहतुकीसाठी पुलाची रुंदी ८.१५० मीटर एवढी आहे.