रेल्वेत नोकरी देण्याच्या आमिषाने दहा जणांची दहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी रेल्वेत नोकरीच्या आमिषाने अनेकांची फसवणूक केल्याचा संशय बंडगार्डन पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकरणी अभिषेक विजय तांबे (रा. कात्रज), योगेश संतराम माने, निलेश संतराम माने (रा. ताडीवाला रस्ता) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार आणि आरोपी ओळखीचे आहेत. पुणे रेल्वे स्थानकातील आरएमएस विभागात (रेल्वे मेल सर्व्हिस) नोकरी लावण्याचे आमिष आरोपींनी दाखविले होते. फिर्यादी आणि त्याच्या नातेवाईकांकडून नोकरी लावण्याच्या आमिषाने आरोपींनी दहा लाख ८१ हजार रुपये उकळले. त्यांना रेल्वेचे बनावट नियुक्तीपत्र दिले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी तक्रारदाराने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 people cheated with the lure of railway jobs pune print news rbk 25 amy
First published on: 05-02-2023 at 10:49 IST