लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : मागणी वाढल्याने लसूण, काकडी, फ्लॉवर, शेवगा आणि घेवड्याच्या दरात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. कोथिंबिर, मेथी, पुदीन्याचे दर स्थिर आहेत. शेपू, कांदापात, करडई, अंबाडी, मुळा, चाकवत, राजगिरा, चुका, चवळई, पालक या पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली.

vegetables, vegetables price,
विश्लेषण : मुंबई, पुण्यात फळभाज्या का कडाडल्या?
MHADA Mumbai, patra chawl scheme 306 houses price hike, patra chawl scheme houses, patra chawl scheme 306 Home Winners , Maharashtra Housing and Area Development Authority,
पत्राचाळ योजनेतील ३०६ घरांच्या किमतीत वाढ? सात ते दहा लाखांनी वाढ प्रस्तावित; विजेत्यांवरील आर्थिक भार वाढणार
Vegetables, expensive, price,
भाज्या महागल्या; वातावरण बदलाचा फटका
vegetables, prices,
फळभाज्या कडाडल्या : ‘या’ भाज्यांचे किलोचे दर शंभरी पार
Smuggling, liquor, Goa, mango boxes,
आंब्याच्या पेट्यांमधून गोव्यातील मद्याची तस्करी; १२ लाखांचे विदेशी मद्य जप्त
Crowds in the market to buy raincoats umbrellas thane
बाजारात रेनकोट, छत्र्या खरेदीसाठी गर्दी; छत्र्या – रेनकोटच्या दरात वाढ
toxins, spices , news,
विषद्रव्यांचा हिमनग..
Keep your pets fit and active indoors during the heatwave
तापमानाचा वाढला पारा, लाडक्या पाळीव प्राण्यांचे आरोग्य सांभाळा! उष्णतेच्या लाटेमुळे कुत्रा-मांजरही त्रासले, अशी घ्या त्यांची काळजी?

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी (२८ एप्रिल) राज्य, तसेच परराज्यातून मिळून ९० ते १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश, कर्नाटकातून प्रत्येकी ३ टेम्पो तोतापुरी कैरी, गुजरात, कर्नाटकातून मिळून ३ ते ४ टेम्पो कोबी, ३ ते ४ टेम्पो घेवडा, पावटा २ ते ३ टेम्पो, भुईमूग शेंग २ टेम्पो, आंध्र प्रदेश, तामिळनाडूतून ५ ते ६ टेम्पो शेवगा, राजस्थानातून २ ट्रक गाजर, हिमाचल प्रदेशातून ५ते ६ ट्रक मटार, मध्य प्रदेशातून ८ ते ९ टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

आणखी वाचा- पिंपरी : ७६ हजार मालमत्ताधारकांकडे ७१७ कोटींचा कर थकीत; महापालिकेकडून नोटिसा

पुणे विभागातून सातारी आले ५०० ते ६०० गोणी, भेंडी ७ ते ८ टेम्पो, गवार ७ ते ८ टेम्पो, टोमॅटो ७ ते ८ हजार पेटी, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, कोबी ४ ते ५ टेम्पो, फ्लॉवर ४ ते ५ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, काकडी ८ ते १० टेम्पो, पारनेर भागातून ५ टेम्पो मटार, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा ७० ते ८० ट्रक तसेच इंदूर, आग्रा आणि स्थानिक भागातून ३० ते ३५ ट्रक बटाटा अशी आवक झाली.

कोथिंबिर, मेथी, पुदीन्याचे दर स्थिर आहेत. शेपू, कांदापात, करडई, अंबाडी, मुळा, चाकवत, राजगिरा, चुका, चवळई, पालक या पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली. मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी कोथिंबीर दीड लाख जुडी, मेथीच्या ७० हजार जुडी अशी आवक झाली. किरकोळ बाजारात एक जुडी मेथी, कोथिंबिरेचे दर २० ते २५ रुपयांपर्यंत आहेत.