पुणे जिल्ह्यात १०३ जणांना नव्याने करोना संसर्ग |103 new corona patients in Pune district pune | Loksatta

पुणे जिल्ह्यात १०३ जणांना नव्याने करोना संसर्ग

बहुसंख्य करोना रुग्णांना सौम्य लक्षणे असून ते घरच्या घरी बरे होत असल्याने घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यात १०३ जणांना नव्याने करोना संसर्ग
संग्रहित छायाचित्र /लोकसत्ता

पुणे : बुधवारी दिवसभरात जिल्ह्यातील १०३ जणांना करोना संसर्गाचे निदान झाले. राज्याच्या साथरोग सर्वेक्षण विभागाने याबाबत माहिती दिली. मात्र, बहुसंख्य करोना रुग्णांना सौम्य लक्षणे असून ते घरच्या घरी बरे होत असल्याने घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बुधवारी दिवसभरात आढळलेल्या १०३ नवीन रुग्णांपैकी ४९ रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रातील आहेत. ३८ रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात, तर १६ रुग्ण जिल्ह्याच्या उर्वरित भागात आढळले आहेत.

संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी विशेषत: जोखीम गटातील रुग्ण, सहव्याधीग्रस्त आणि ज्येष्ठ नागरिकांनी तसेच लसीकरण न झालेल्या नागरिकांनी मुखपट्टी वापरासह सर्व आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. बुधवारी आढळलेल्या १०३ नव्या रुग्णांमुळे पुणे जिल्ह्यातील एकूण करोना रुग्णसंख्या १५ लाख दोन हजार ३०२ एवढी झाली आहे. सध्या जिल्ह्यातील ७३३ रुग्णांवर करोनाचे उपचार सुरू आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पुणे : सहकारनगर भागात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यास गुन्हे शाखेकडून अटक

संबंधित बातम्या

पुणे : पदवी प्रथम वर्ष प्रवेशांबाबत बीएमसीसीला नोटिस; महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह
तांत्रिक बिघाडामुळे वायुदलाचे हेलिकॉप्टर बारामतीच्या शेतात; आपत्कालीन स्थितीत उतरविले, कोणालाही इजा नाही
PMC Election Result 2017: हे आहेत पुण्यातील विजयी उमेदवार

व्हिडिओ

ताज्या बातम्या
रेल्वेमुळे तुळजापूर, उस्मानाबादच्या विकासाचा मार्ग मोकळा
स्मृतिभ्रंश आजार बरा करणारे औषध शोधण्यात यश ; वृद्धांना मोठा दिलासा
आरोग्य वार्ता : ‘फ्लू’ची लस हृदयरुग्णांसाठी लाभदायी
FIFA World Cup 2022 : अर्जेटिनाची पोलंडवर मात; दोन्ही संघ बाद फेरीत
FIFA World Cup 2022 : गोलफरकामुळे मेक्सिकोचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात