जिल्ह्यात १०४ जणांना नव्याने संसर्ग

मंगळवारी दिवसभरात जिल्ह्यातील १०४ जणांना करोना संसर्गाचे निदान झाले. राज्याच्या साथरोग सर्वेक्षण विभागाने याबाबत माहिती दिली.

जिल्ह्यात १०४ जणांना नव्याने संसर्ग
( संग्रहित छायचित्र )

पुणे : मंगळवारी दिवसभरात जिल्ह्यातील १०४ जणांना करोना संसर्गाचे निदान झाले. राज्याच्या साथरोग सर्वेक्षण विभागाने याबाबत माहिती दिली. मात्र, बहुसंख्य करोना रुग्णांना सौम्य लक्षणे असून ते घरच्या घरी बरे होत असल्याने घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शुक्रवारी दिवसभरात आढळलेल्या १०४ नवीन रुग्णांपैकी ५५ रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रात आहेत. २८ रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात, तर २१ रुग्ण जिल्ह्याच्या उर्वरित भागात आढळले आहेत. जिल्ह्यात मंगळवारी करोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी विशेषत: जोखीम गटातील रुग्ण, सहव्याधीग्रस्त आणि ज्येष्ठ नागरिकांनी तसेच लसीकरण न झालेल्या नागरिकांनी मुखपट्टी वापरासह सर्व आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शुक्रवारी आढळलेल्या १०४ नव्या रुग्णांमुळे पुणे जिल्ह्यातील एकूण करोना रुग्णसंख्या १४ लाख ९२ हजार ६०५ एवढी झाली आहे. जिल्ह्यातील १९१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 104 new infections corona infection epidemic patients pune print news ysh

Next Story
कपडय़ांच्या किमतीत लवकरच वाढ?; कापड उद्योगावर कापूस तुटवडय़ाचे संकट; अतिवृष्टीने नुकसान, किडीचाही प्रादुर्भाव
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी