पुणे : महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात येणारी दहावीची परीक्षा मंगळवारपासून (१५ मार्च) सुरू होत आहे. १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली असून, मुख्य केंद्र आणि उपकेंद्र मिळून २१ हजार ३८४ ठिकाणी परीक्षा होणार आहे.

राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करावा लागला होता. यंदा करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य मंडळाने प्रत्यक्ष परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बारावीची परीक्षा ४ मार्चपासून सुरू झाली आहे, तर आजपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. विद्यार्थी करोना बाधित झाल्याने किंवा अन्य वैद्यकीय, अपरिहार्य कारणांमुळे प्रात्यक्षिक, लेखी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा देऊ न शकल्यास ५ एप्रिल ते २२ एप्रिल या कालावधीत परीक्षा घेतली जाईल. तर पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये घेण्याचे राज्य मंडळाचे नियोजन आहे.

Selection list of eligible students for NMMMS scholarship announced Pune
 ‘एनएमएमएमएस’ शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर… किती विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती?
How many candidates appeared in the last offline set exam The set will be held twice a year
शेवटच्या ऑफलाइन सेट परीक्षेला किती उमेदवारांची उपस्थिती? सेट वर्षातून दोनवेळा होणार?
set exam date marathi news, set exam 7th april marathi news
‘सेट’ परीक्षा ७ एप्रिल रोजी, मुंबईतील २८ केंद्रांवर १४ हजार ४२६ परीक्षार्थी परीक्षा देणार
Kendriya Vidyalaya
केंद्रीय विद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया सुरू, कधीपर्यंत भरता येणार अर्ज?

 करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रावर करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी राज्य मंडळाने प्रसिद्ध आणि छपाई केलेले वेळापत्रकच ग्राह्य धरावे, असे डॉ. भोसले यांनी नमूद केले आहे.

परीक्षेसाठी प्रशासकीय तयारी

  • ७० ते १०० गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी ३० मिनिटे जादा वेळ 
  • ४० ते ६० गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी १५ मिनिटे जादा वेळ 
  • परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथके, महिलांची विशेष पथके स्थापन,
  • परीक्षा केंद्रांचे चित्रीकरण
  • विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान तणावाबाबत मार्गदर्शनासाठी समुपदेशकांची नियुक्ती 

विद्यार्थ्यांनी तासभर आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. जेणेकरून परीक्षा केंद्रांवर अडचण होणार नाही. विद्यार्थ्यांनी कोणताही ताण न घेता, कोणत्याही गैरप्रकाराला बळी न पडता परीक्षेला सामोरे जावे.

– शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य मंडळ

२१ हजार ३८४ एकूण परीक्षा केंद्रे

मुख्य केंद्रे : ५ हजार ५०

उपकेंद्रे : १६ हजार ३३४ 

१६ लाख ३८ हजार १७२ परीक्षा अर्ज भरलेले विद्यार्थी  

विद्यार्थी : ८ लाख ८९ हजार ५८४

विद्यार्थिनी : ७ लाख ४९ हजार ४७८