धक्कादायक! चॉकलेटचे आमिष दाखवून १२ वर्षीय मुलाचा ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

पिंपरी-चिंचवडमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली असून पालकांना चिंतेत टाकणारी आहे.

(प्रतिनिधिक फोटो)

पिंपरी-चिंचवडमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली असून पालकांना चिंतेत टाकणारी आहे. अवघ्या १२ वर्षीय मुलाने ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चिखली पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप १२ वर्षीय मुलाला ताब्यात घेण्यात आल नाही. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ वर्षीय मुलगा हा पीडित ४ वर्षीय चिमुकलीच्या शेजारीच राहण्यास आहे. शेजारी असल्याने मुलाला पीडित मुलीच्या घरातील सर्व व्यक्ती ओळखत होते. दरम्यान, मुलाच्या घरी कोणी नसताना ४ वर्षीय चिमुकलीला त्याने घरी आणले, मुलाने चॉकलेट आणण्यास पैसे देतो असे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले अस तक्रारीत म्हटलं आहे. अत्याचार करत असताना मुलाला पीडित मुलीच्या आईने पकडले अशी माहिती चिखली पोलिसांनी दिली आहे. या गंभीर घटनेमुळे पालक चिंतेत होते. अखेर पोलिसात तक्रार द्यायची अस पीडित मुलीच्या आईने ठरवले. त्यानुसार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप मुलाला ताब्यात घेण्यात आले नाही. 

“करोनामुळे सध्या ऑनलाइन शिक्षण आहे. मुलांच्या हातात मोबाईल दिला जात आहे. मुलं काय पाहतात? काय करतात हे पालकांनी पाहायला हवं. मोबाईल मध्ये चाइल्ड लॉक हवं, जेणेकरून मुलांनी कुठली साईट, व्हिडिओ पाहावेत यावर बंधन येतील. मुलांची संगत देखील महत्वाची असते. अनेकदा मुलांमध्ये वेगवेगळे व्हिडिओ पाहिले जातात.”

प्रेरणा कट्टे- सहाय्यक पोलीस आयुक्त

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 12 year old boy abuses 4 year old chimukali by showing him the lure of chocolate srk 94 kjp

Next Story
VIDEO: बुधवार चौकात होता दुसऱ्या बाजीरावांचा बुधवार वाडा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी