scorecardresearch

बारावीची परीक्षा सुरळीत सुरू, संपाचा परिणाम नाही

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी आजपासून संप पुकारला आहे. मात्र दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने या संपाचा परिणाम परीक्षांवर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती.

exam
(प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने सहकार्याची भूमिका घेतल्यामुळे राज्यात बारावीची परीक्षा सुरळीत सुरू झाली आहे. शासकीय कर्मचारी संपाचा या परीक्षेवर परिणाम झालेला नाही.

हेही वाचा – बारावीच्या परीक्षा होणार, उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार

हेही वाचा – जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत, सोमाटने टोल नाका इथे आंदोलन सुरु

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी आजपासून संप पुकारला आहे. मात्र दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने या संपाचा परिणाम परीक्षांवर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाच्या कार्यकारिणीने विद्यार्थीहित लक्षात घेऊन बारावीच्या परीक्षा पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. मात्र बारावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी, अकरावीच्या परीक्षा, मूल्यमापन, अध्यापन करणार नसल्याची भूमिका स्पष्ट करत महासंघाने जुनी पेन्शन योजना आणि इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीच्या संपामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बारावीची आजची परीक्षा वेळेवर, कोणत्याही अडचणींविना सुरू झाली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-03-2023 at 12:38 IST
ताज्या बातम्या