scorecardresearch

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपींविरुद्ध १३ पुरावे सादर

आरोपींच्या छायाचित्रांबाबत कागदपत्रांच्या पुराव्यांचा त्यात समावेश आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपींविरुद्ध १३ पुरावे सादर

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींविरोधात अन्वेषण विभागातर्फे(सीबीआय) गुरुवारी न्यायालयात १३ पुरावे सादर करण्यात आले. घटनास्थळाचा पंचनामा, मृत्यूचे कारण, मृत्यूची वैद्यकीय सूचना, न्यायवैद्यक प्रयोगशाळांचे अहवाल, आरोपी संजीव पुनाळेकर यांच्या कार्यालयातून जप्त केलेले दोन लॅपटॉप आणि आरोपींच्या छायाचित्रांबाबत कागदपत्रांच्या पुराव्यांचा त्यात समावेश आहे.

गुन्हेगारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम २९४ नुसार, खटल्याशी संबंधित कागदपत्रांची यादी सीबीआयने विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सादर केली. या गुन्ह्यात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे, अ‍ॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्यावर आरोप निश्चिती करण्यात आली. आरोपींनी मात्र गुन्हा कबूल नसल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यामुळे आता सरकार आणि बचाव पक्षातर्फे पुराव्यासंबंधीची कागदपत्रे सादर केली जाणार होती. त्यानुसार हे पुरावे सादर करण्यात आले.  

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 13 evidences presented against accused in dr narendra dabholkar murder case akp

ताज्या बातम्या