पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने अभियंत्याची १५ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी अभियंत्याची ऑनलाइन पद्धतीने फसवणूक केली असून मुंढवा पोलिसांकडून चारजणांच्या विरोधात माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अनुराग शर्मा, नेहा शर्मा, मिलिंद विश्वास आणि एका बॅक खातेधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ४६ वर्षीय अभियंत्याने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संबंधित अभियंता हा घोरपडी परिसरात राहायला आहे. आरोपींनी अभियंत्याशी मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष आरोपींनी अभियंत्याला दाखविले होते. आरोपींनी सुरुवातीला अभियंत्याला ४० हजार रुपये गुंतवण्यास सांगितले. त्यानंतर आरोपींनी त्याला ५० हजार रुपये परतावा दिला होता.

CJI Chandrachud says enactment of three new criminal laws
नवीन फौजदारी कायदे समाजासाठी ऐतिहासिक! न्याय व्यवस्थेचे नवीन युगात संक्रमण झाल्याची सरन्यायाधीशांकडून प्रशंसा
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
fraud with 628 investors
गुंतवणुकीच्या नावाखाली ६२८ गुंतवणूकदारांची ५७९ कोटींची फसवणूक, आरोपी सनदी लेखापालाला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

हेही वाचा : पुणे : ‘किबे लक्ष्मी थिएटरचा’ आज वर्धापनदिन

अभियंत्याला परताव्यापोटी दहा हजार रुपये मिळाले. त्यामुळे आरोपींच्या बतावणीवर त्याने विश्वास ठेवला. त्यानंतर अभियंत्याला आणखी रक्कम गुंत‌वणूक करण्यास सांगितले. आरोपींनी अभियंत्याकडून वेळोवेळी १५ लाख ८५ हजार रुपये घेतले. ऑनलाइन पद्धतीने एका बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले. त्यानंतर अभियंत्याला परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अभियंत्याने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद काकडे तपास करत आहेत.