लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : महापालिकेने पाचवी व आठवी मधील शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १५ विद्यार्थ्यांना भारत दर्शन अभ्यास दौऱ्यावर पाठविण्यात आले आहे. हे विद्यार्थी सहा दिवसांसाठी बंगळुरू, म्हैसूर, उटी आणि कोईम्बतूर येथे अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत.

Mumbai police latest news in marathi
मुंबई पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत गैरप्रकार, आधीच दिली होती सूचना तरीही…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
CET registration, students, Ticket facility, CET ,
सीईटी नोंदणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘तिकीट सुविधा’
wardha school students attendance biometric
प्रायव्हेट कोचिंग क्लासेसवर लगाम!; शाळांमध्ये विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी नसल्यास…
yavatmal Adv Pranav Vivek Deshmukh graduated from London School of Economics
यवतमाळचा विद्यार्थी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत
Kavikulaguru Kalidas Sanskrit University ,
‘या’ विद्यापीठात मिळणार कर्मकांडाचे प्रशिक्षण! उद्देश वाचून थक्क व्हाल…
graduates Phd Mumbai University, Mumbai University,
मुंबई विद्यापीठातून यंदा ४०१ स्नातकांना पी.एचडी, मुंबई विद्यापीठाचा मंगळवारी पदवी प्रदान सोहळा
Mumbai University TYBCom semester 5 result announced
तृतीय वर्ष ‘बी. कॉम.’ पाचव्या सत्र परीक्षेत ४१.७५ टक्के उत्तीर्ण; मुंबई विद्यापीठाकडून १८ दिवसांत निकाल जाहीर

महापालिकेच्या शिक्षण विभागाने शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता गेल्यावर्षी पासून भारत दर्शन अभ्यास दौरा सुरू केला आहे. यावर्षीच्या अभ्यास दौऱ्यामध्ये विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि भारतीय विज्ञान संस्था या संस्थांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांशी संवाद साधता येणार आहे. त्यासोबतच, अंतराळ संशोधनाच्या क्षेत्राचा अभ्यास आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाबाबत माहिती मिळणार आहे. या अभ्यास दौऱ्यावर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा समावेश आहे.

आणखी वाचा-पोलिसांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे ‘कात्रज’ चौकाची कात्रीतून सुटका

भारत दर्शन अभ्यास दौरा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने सुरू केला आहे. हा उपक्रम महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावित आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक अनुभव देऊन समाजासाठी योगदान देऊ शकणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा विकास करण्याचे उद्दिष्ट असल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी सांगितले.

Story img Loader