पुण्यातील कात्रज आंबेगाव परिसरात तब्बल १५० लिटर भेसळयुक्त तुप जप्त करण्यात आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून महेंद्रसिंह देवरा या आरोपीस भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवले पूलावरून कात्रजच्या दिशने जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला आयशर शो रुमच्या जवळ असलेल्या एका इमारतीमध्ये भेसळयुक्त तुप तयार केले जात आहे, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, डालडा आणि जेमिनी तेल एकत्र करून तुप तयार केले जात असल्याचे निदर्शनास आले.

13 year old school boy dies after drowning in private swimming pool
पुणे: खासगी जलतरण तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?
students clashed again in pune university premises
पुन्हा विद्यार्थी भिडले! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात पुन्हा हाणामारी….
Crime against four for polluting Pavana river
पिंपरी : पवना नदी प्रदूषित करणाऱ्या चौघांवर गुन्हा

तिथे अशा प्रकाराचे तब्बल १५० लिटर भेसळयुक्त तुप आढळून आले. यासाठी लागणारे साहित्य देखील होते. या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनच्या अधिकार्‍यांना सांगण्यात आले. त्यानंतर ते तेथील तुपाचे नमुने तपासणीसाठी घेऊन गेले आहेत. तर या प्रकरणी आरोपी महेंद्र सिंह देवरा याच्याकडे अधिक चौकशी सुरू असल्याचे सांगितले.