पिंपरी महापालिकेच्या वतीने गणेशोत्सवातील दहा दिवस मिळून १५२ टन निर्माल्य संकलित करण्यात आले. आठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ३८ खेपांच्या माध्यमातून हे निर्माल्य जमा करण्यात आले.पालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी गणेश देशपांडे यांनी ही माहिती दिली. पालिकेच्या वतीने ३१ ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२२ या कालावधीत प्रभागनिहाय निर्माल्य संकलित करण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

हेही वाचा >>> पुणे : विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरणारा हरियाणातील चोरटा गजाआड

अ प्रभागात ७ खेपांच्या माध्यमातून २६,९३५ किलो निर्माल्य जमा झाले. त्याचपद्धतीने ब प्रभाग – ४ खेपा १८,५८५ किलो. क प्रभाग – ७ खेपा १३,४७५ किलो. ड प्रभाग – ७ खेपा १९,८८५ किलो. इ प्रभाग – ३ खेपा १४,७३० किलो. फ प्रभाग – ३ खेपा १९,३९० किलो. ग प्रभाग – ४ खेपा १५,६६५ किलो. ह प्रभाग – ३ खेपा – १२,३०५ किलो. याप्रकारे एकूण ८ क्षेत्रीय कार्यालयांमधील निर्माल्य जमा करण्यात आले. याशिवाय, मेट्रो गार्डन रावेत, ऑक्सिजन पार्क चिंचवड, जोतिबा गार्डन काळेवाडी या ठिकाणी १२ टन निर्माल्य संकलित करण्यात आल्याचे देशपांडे यांनी सांगितले.