scorecardresearch

पुणे : जिल्ह्यात १५८ जणांना नव्याने करोना संसर्ग

रविवारी दिवसभरात जिल्ह्यातील १५८ जणांना करोना संसर्गाचे निदान झाले.

पुणे : जिल्ह्यात १५८ जणांना नव्याने करोना संसर्ग
( संग्रहित छायचित्र )

रविवारी दिवसभरात जिल्ह्यातील १५८ जणांना करोना संसर्गाचे निदान झाले. राज्याच्या साथरोग सर्वेक्षण विभागाने याबाबत माहिती दिली. मात्र, बहुसंख्य करोना रुग्णांना सौम्य लक्षणे असून ते घरच्या घरी बरे होत असल्याने घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> पिंपरीत उत्सवकाळात १५२ टन निर्माल्य संकलित

रविवारी दिवसभरात आढळलेल्या १५८ नवीन रुग्णांपैकी ९२ रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रातील आहेत. ४६ रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात, तर २० रुग्ण जिल्ह्याच्या उर्वरित भागात आढळले आहेत. संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी विशेषत: जोखीम गटातील रुग्ण, सहव्याधीग्रस्त आणि ज्येष्ठ नागरिकांनी तसेच लसीकरण न झालेल्या नागरिकांनी मुखपट्टी वापरासह सर्व आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. रविवारी आढळलेल्या १५८ नव्या रुग्णांमुळे पुणे जिल्ह्यातील एकूण करोना रुग्णसंख्या १४ लाख ९८ हजार ७७६ एवढी झाली आहे. जिल्ह्यातील १३७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 158 new corona infections in the district pune print news amy

ताज्या बातम्या