scorecardresearch

Premium

पुणे : पोहताना दम लागल्याने जलतरण तलावात बुडून सोळा वर्षीय मुलाचा मृत्यू

जलतरण तलावात पाेहणाऱ्या एका मुलाच्या लक्षात हा प्रकार आला. त्याने जलतरण तलावाच्या व्यवस्थापनाला याबाबतची माहिती दिली.

swimming pool
कात्रज भागातील जलतरण तलावात दुर्घटना (प्रातिनिधिक फोटो सौजन्य रॉयटर्स)

कात्रज परिसरातील जांभुळवाडीत असलेल्या एका जलतरण तलावात बुडून सोळा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली.

सोमेश राठोड (वय १६, रा. सच्चसाईमाता मंदिराजवळ, कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. जांभुळवाडी भागात अर्जुुन जलतरण तलाव आहे. राठोड सोमवारी दुपारी जलतरण तलावात पोहण्यास गेला होता. पोहताना दमछाक झाल्याने तो बुडाला. जलतरण तलावात पाेहणाऱ्या एका मुलाच्या लक्षात हा प्रकार आला. त्याने जलतरण तलावाच्या व्यवस्थापनाला याबाबतची माहिती दिली. राठोड याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

last week nifty and sensex
बाजाराचा तंत्र-कल : सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या…
unique celebration of birth of girl child in the thergaon hospital
महापालिकेच्या थेरगाव रुग्णालयात मुलीच्या जन्माचे अनोखे स्वागत; बालिकेच्या ‘सुकन्या समृद्धी’ खात्यात डॉक्टरांकडून बचत
Husband commits suicide
“तिला सुखरूप माहेरी जावू द्या…”, पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
dombivli police, dombivli worker death, dombivli police registered case on contractors
डोंबिवलीत कामगाराच्या मृत्युप्रकरणी विद्युत, रंगारी ठेकेदारांवर गुन्हे

जलतरण तलावाच्या परिसरात जीवरक्षक नेमण्यात आले नव्हते. याबाबतची तक्रार रहिवाशांनी महापालिकेकडे काही दिवसांपूर्वी केली होती. जलतरण तलाव व्यवस्थापनाच्या बेजबाबदारीमुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 16 year old boy drowns in swimming pool died pune print news scsg

First published on: 03-05-2022 at 08:08 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×