Premium

विसर्जन सोहळ्यासाठी पुण्यातील ‘हे’ १७ रस्ते राहणार उद्या बंद

विसर्जन मिरवणूक सोहळ्यानिमित्त वाहतूक पोलिसांनी नियोजन केले आहे. विसर्जन सोहळ्यासाठी वाहतूक शाखेकडून बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

17 roads in Pune will be closed tomorrow
वाहतुकीसाठी बंद असणारे रस्ते मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर वाहतुकीसाठी खुले करून दिले जाणार आहेत. (फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : विसर्जन सोहळ्यानिमित्त गुरुवारी (२८ सप्टेंबर) लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, तसेच केळकर रस्त्यासह प्रमुख १७ रस्ते वाहतुकीस बंद राहणार आहेत.

विसर्जन मिरवणूक सोहळ्यानिमित्त वाहतूक पोलिसांनी नियोजन केले आहे. विसर्जन सोहळ्यासाठी वाहतूक शाखेकडून बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांसह सातशे पोलीस कर्मचारी वाहतूक नियोजन करणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत पोहोचवण्यासाठी, तसेच रुग्णवाहिकेसाठी मार्ग खुला करून देण्याच्या सूचना बंदोबस्तावरील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. विसर्जन मिरवणूक सोहळा पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी वाहने लावण्यासाठी पोलिसांनी जागा उपलब्ध करून दिल्या आहेत, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आणखी वाचा-‘म्हाडा’च्या घरांसाठी मिळणार ७० हेक्टर जमीन, जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात आहेत जमिनी

वाहतुकीसाठी बंद असणारे रस्ते मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर वाहतुकीसाठी खुले करून दिले जाणार आहेत. वाहतुकीसाठी बंद असणारे रस्ते पुढीलप्रमाणे- शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, गणेश रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता, शास्त्री रस्ता, जंगली महाराज रस्ता (झाशीची राणी चौक ते खंडोजीबाबा चौक), कर्वे रस्ता (नळस्टॉप चौक ते खंडोजीबाबा चैाक), फर्ग्युसन रस्ता (खंडोजीबाबा चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वार), भांडारकर रस्ता (पीवायसी जिमखानाा ते गोखले स्मारक चैाक), पुणे-सातारा रस्ता (व्होल्गा चौक ते जेधे चौक), सोलापूर रस्ता ( ढोले पाटील चौक- सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौक), प्रभात रस्ता (डेक्कन पोलीस ठाणे तसेच शेलारमामा चौक ), बगाडे रस्ता (सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक), गुरुनानक रस्ता (देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक ते गोविंद हलवाई चौक)

विसर्जनासाठी वर्तुळाकार मार्ग

विसर्जन सोहळ्यानिमित्त वाहतूक पोलिसांनी पर्यायी वर्तुळाकार मार्ग तयार केला आहे. वाहनचालकांनी पर्यायी वर्तुळाकार मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे- कर्वे रस्ता, नळस्टॉप चौक, विधी महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट रस्ता, गणेशखिंड रस्ता, वेधशाळा चौक, संचेती हॉस्पिटल, अभियांत्रिकी महाविद्यालय, शाहीर अमर शेख चौक, मालधक्का चौक, बोल्हाई चौक, नरपतगिरी चौक, नेहरु रस्ता, संत कबीर पोलीस चौकी, सेव्हन लव्हज चौक, वखार महामंडळ चौक, मार्केट यार्ड, शिवनेरी रस्ता, सातारा रस्ता, लक्ष्मीनारायण चित्रपटगृह, मित्रमंडळ चौक, सिंहगड रस्ता, शास्त्री रस्ता, सेनादत्त पोलीस चौकी, म्हात्रे पूल, नळस्टॉप चौक.

आणखी वाचा-पुणे: गणेशोत्सवात मोबाइल चोरणारी झारखंडमधील टोळी गजाआड; ५२ मोबाइल जप्त

विसर्जन सोहळ्यासाठी वाहतूक बदल

  • प्रमुख १७ रस्ते वाहतुकीस बंद
  • विसर्जन मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर रस्ते वाहतुकीस खुले
  • शहरात जड वाहनांना प्रवेश बंदी
  • शहराच्या मध्य भागात बांबूचे अडथळे
  • खंडोजीबाबा चौक ते वैशाली हॉटेलदरम्यान वाहने लावण्यास मनाई

वाहनांना वळण्याची ठिकाणे (डायव्हर्शन पॉईंट)

  • जंगली महाराज रस्ता, झाशीची राणी चौक
  • शिवाजी रस्ता, गाडगीळ पुतळा चौक
  • मुदलीयार रस्ता, दारुवाला पूल, अपोलो चित्रपटगृह चौक
  • सोलापूर रस्ता, सेव्हन लव्हज चौक
  • सातारा रस्ता, लक्ष्मीनारायण चित्रपटगृह
  • बाजीराव रस्ता, सावरकर पुतळा चौक
  • शास्त्री रस्ता, सेनादत्त पोलीस चौकी
  • कर्वे रस्ता, सेनादत्त पोलीस चौकी
  • फर्गसन महाविद्यालय रस्ता, गोखले स्मारक चौक

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 17 roads in pune will be closed tomorrow for immersion ceremony pune print news rbk 25 mrj

First published on: 27-09-2023 at 11:56 IST
Next Story
‘म्हाडा’च्या घरांसाठी मिळणार ७० हेक्टर जमीन, जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात आहेत जमिनी