scorecardresearch

राज्यातील १९ लाख विद्यार्थी अद्यापही आधार कार्ड विना

राज्यभरातील शाळांतील १९ लाख विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्याचे, तर ४ लाख विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरील तपशीलात त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे.

राज्यातील १९ लाख विद्यार्थी अद्यापही आधार कार्ड विना
लोकसत्ता ग्राफिक्स टीम

चार लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या तपशीलात त्रुटी, शिक्षक-मुख्याध्यापकांना डोकेदुखी

पुणे: राज्यभरातील शाळांतील १९ लाख विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्याचे, तर ४ लाख विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरील तपशीलात त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे. शासकीय, अनुदानित शाळांमधील संचमान्यतेसाठी आधार कार्डची नोंदणी बंधनकारक असल्याने आधार कार्ड काढणे, चुकांची दुरुस्ती करण्याचे काम शिक्षक, मुख्याध्यापकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

राज्य सरकारकडून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी केली जाणारी संचमान्यता आधार नोंदणीच्या आधारे होणार आहे. शाळांमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे आधारकार्ड असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच विविध योजनाही विद्यार्थ्यांच्या आधार कार्डशी संलग्न करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. मात्र सरल प्रणालीवरील आकडेवारीनुसार राज्यातील २ कोटी ३३ लाख १३ हजार ७६२ विद्यार्थ्यांपैकी २ कोटी १३ लाख ५८ हजार २४७ विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड आहे. तर १९ लाख विद्यार्थ्यांचे अद्यापही आधार कार्ड नाही. १ कोटी २७ लाख ६१ हजार १११ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड वैध ठरले आहे. तर आधार कार्ड असलेल्या विद्यार्थ्यांपैकी ४ लाख १ हजार २५० विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरील नाव, जन्मतारीख, पत्ता या तपशीलाच्या चुका आहेत.

हेही वाचा >>> भोसरीत महिलेची ३२ लाखांची फसवणूक

आधार कार्डवरील तपशीलाच्या चुका दुरुस्त करून अद्ययावतीकरणाचे काम काम शासनाने शाळांवर टाकल्याने शिक्षक, मुख्याध्यापकांना धावाधाव करावी लागत आहे. विद्यार्थ्यांची आधार नोंदणी, त्रुटी दुुरुस्ती, संलग्नतेचा घोळ राज्यभरात सुरू आहे. शिक्षकांना ही कामे करावी लागत असल्याने त्याचा परिणाम शैक्षणिक कामकाजावर होत आहे.

आधार कार्डच्या तपशीलांतील त्रुटींच्या दुरुस्तीसाठी शिक्षकांनाच काम करावे लागत आहे. आधार नोंदणीनुसार संचमान्यता करणे अन्यायकारक आहे. विद्यार्थ्यांच्या आधार तपशीलातील त्रुटी दुुरुस्त न झाल्यास त्यांची नोंद होणार नाही. परिणामी पटसंख्या कमी दिसेल, शिक्षक अतिरिक्त ठरतील. आधार संलग्नतेबरोबरच शिक्षण विभागाने शाळास्तरावर विद्यार्थ्यांच्या संख्येची प्रत्यक्ष पडताळणी करणे आवश्यक आहे. जेणेकरून आधार कार्ड तपशीलात त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांचीही नोंद होईल. तसेच शालेय पोषण आहारासारख्या योजनांचे लाभ आधार कार्ड असलेल्या विद्यार्थ्यांनाच देणे चुकीचे आहे.

– महेंद्र गणपुले, राज्य प्रवक्ता, मुख्याध्यापक महामंडळ

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 18:07 IST

संबंधित बातम्या