scorecardresearch

टँकरच्या चाकाखाली येऊन तरुणाचा मृत्यू

शंतनू पुजारी असे या तरुणाचे नाव.

loksatta, marathi news paper, news paper, news online, marathi news, marathi news online, newspaper, news, latest news in marathi, current news in marathi,sport news in marathi, bollywood news in marathi girl tried to commit suicide depression college girl suicide try
मोशीत गळफास घेऊन महिलेनं जीवनयात्रा संपवली.

कोथरूड येथील बिंदू माधव ठाकरे रुग्णालयासमोर शुक्रवारी दुपारी महापालिकेच्या पाण्याच्या टँकरखाली सापडून तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शंतनू पुजारी (वय १९)असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

शंतनू पुजारी हा त्याच्या मित्रा सोबत कॉलेज वरून पावणे तीनच्या सुमारास दुचाकी वरून घरी जात होता. बिंदू माधव ठाकरे रुग्णालयाच्या समोरील रस्त्यावरून जात असताना अचानक शंतनूची दुचाकी दुचाकी घसरली. याच दरम्यान तिथून महापालिकेच्या पाण्याने भरलेल्या टँकर जात होता. या टँकरच्या मागील चाकाखाली सापडून शंतनूचा गंभीर जखमी झाला. त्यानंतर शंतनूला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. टँकर चालकाला अलंकार पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2017 at 23:41 IST