पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पेठ क्र. १२ येथील आणि पेठ क्र. ३०-३२ येथील सर्वांसाठी परवडणारी घरे योजनेअंतर्गत शिल्लक असलेल्या सदनिकांच्या लॉटरी योजनेला प्रतिसाद मिळत आहे. सदनिकेसाठी एक हजार ९३२ नागरिकांनी प्राथमिक नोंदणीची प्रक्रिया संकेतस्थळावरून पूर्ण केली आहे.

पीएमआरडीएकडून १ हजार ३३७ शिल्लक सदनिकांसाठी लाॅटरी काढण्यात आली आहे. त्याअंतर्गत पेठ क्रमांक १२ येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील (ईडब्ल्यूएस) ४७ सदनिका, कमी उत्पन्न गट (एलआयजी) प्रवर्गासाठी ६१४ सदनिका आणि पेठ क्रमांक ३०-३२ येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत ३४७ सदनिका आणि एलआयजी प्रवर्गातील ३२९ सदनिका अशा एकूण १ हजार ३३७ सदनिका उपलब्ध आहेत.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Bangladesh pulled plug on key internet deal with India
भारताला मोठा धक्का; बांगलादेश आणि भारताचा इंटरनेट करार…
Sharad Pawar Workers Angry over Anushakti nagar
Anushakti Nagar : “आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून आम्हाला टाळलं असावं”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत बंडखोरी होणार?
Goa Boycott Viral Post man called tourist trap for inflation and dirty beaches debate broke out
“गोवा म्हणजे पर्यटकांना जाळ्यात अडकवण्याचा सापळा”, गोव्यातील पर्यटनावर युजर्सचा संताप; म्हणाले, ‘घाणेरडे…
Washim Constituency, Washim BJP,
VIDEO : भाजपने तिकीट कापले अन् आमदार रडायला लागले; म्हणाले, “पक्षाने माझ्यावर…”
Puneri pati viral only punekars know how to make and deal with them
“आमच्या मुलाचे लग्न…” पुण्यात मुलाला स्थळ आणणाऱ्यांसाठी पालकांनी घराबाहेर लावली भन्नाट पाटी; वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल
maharastra vidhan sabha election 2024 shivsena ubt workers upset over muslim candidate
उद्धव ठाकरेंच्या निर्णयामुळे शिवसैनिक नाराज
mla srinivas vanga visited home after 32 hours again went to unknown place for rest
३२ तासानंतर वनगांचा ठावठिकाणा; पहाटे घरी भेट दिल्यानंतर विश्रांतीसाठी पुन्हा अज्ञातस्थळी

हेही वाचा >>> सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत उद्योजकाकडून १२ लाख उकळण्याचा पोलिसांचा प्रयत्न; वाचा काय आहे नेमके प्रकरण?

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील सदनिकांचा आकार २९.५५ चौरस मीटर असून सदनिकांची किंमत १५ लाख ७४ हजार ४२४ एवढी आहे. कमी उत्पन्न गटातील सदनिकांचे क्षेत्र ५९.२७ चौरस मीटर असून किंमत ३५ लाख ५७ हजार २०० एवढी निश्चित करण्यात आली आहे. परवडणारी घरे योजनेअंतर्गत सदनिकांचे क्षेत्र २५.५२ चौरस मीटर आणि किंमत २० लाख ९० हजार ७७१ एवढी तर, कमी उत्पन्न गटातील सदनिकांचा आकार ३४.५७ चौरस मीटर असून त्याची किंमत २८ लाख ३२ हजार २०८ एवढी आहे. त्यासाठी आतापर्यंत १ हजार ९३२ नागरिकांनी संकेतस्थळावर नोंदणी केल्याची माहिती पीएमआरडीए प्रशासनाकडून देण्यात आली. परिपूर्ण अर्ज २९९ नागरिकांनी भरले असून २१८ अर्जदारांनी अनामत रक्कम भरली असून त्यांचे परिपूर्ण अर्ज पीएमआरडीएला प्राप्त झाले आहे. उर्वरित अर्ज कागदपत्रांच्या पुर्ततेअभावी अर्जदारांकडून अपूर्ण आहेत. परंतु, त्यांची प्राथमिक नोंदणीची झाली आहे. परवडणाऱ्या घरांसाठी अर्ज करण्याची मुदत १२ नोव्हेंबर पर्यंत आहे, असे पीएमआरडीएकडून स्पष्ट करण्यात आले.

Story img Loader