scorecardresearch

उपाहारगृह बंद ‌झाल्याचे सांगितल्याने कामगाराला बेदम मारहाण; पुण्यातली घटना

रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

उपाहारगृह बंद झाल्याचे सांगितल्याने कामगाराला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना कात्रज भागात घडली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. जय पांडुरंग निकम (वय २१), प्रशांत प्रकाश जाधव (वय २१, दोघे रा. विठ्ठलनगर, जांभुळवाडी, आंबेगाव बुद्रुक, कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मारहाणीत उपाहारगृहातील कामगार अमोल देवगिरीकर (वय २१, रा. चरवड वस्ती, वडगाव बुद्रुक) जखमी ‌झाला असून त्याने याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


बाह्यवळण मार्गावर भूमकर पुलाजवळ हॉटेल प्यासा आहे. रात्री साडेअकराच्या सुमारास निकम, जाधव उपाहारगृहात आले. देवगिरीकर याने उपाहारगृह बंद ‌झाले असल्याचे दोघांना सांगितले. या कारणावरून दोघांनी देवगिरीकरशी वाद घातला. त्याच्या डोक्यात गज मारला. मारहाणीत देवगिरीकरच्या डोक्याला दुखापत झाली. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 2 men beaten a waiter after he said that the hotel is closed in katraj pune print news vsk

ताज्या बातम्या