शहरातून तडीपार केल्यांतर पिस्तूल घेऊन वावरणाऱ्या गुंडाला गुन्हे शाखेने सिंहगड रस्ता भागात पकडले. गुंडाकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. मुंढवा भागात तडीपार गुंडाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला आहे. अजय शंकर सुतार (वय २०, रा. श्रीनिवास अपार्टमेंट, नऱ्हे) असे अटक करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे.

हेही वाचा- पुण्याला वाढीव पाणी मिळणार का?

Thane, Police Arrest Two thefts, Involved in 16 Robberies, Recover Rs 17 Lakh, Stolen Goods , theft in thane, robbery in thane, robbery in badlapur, robbery in badlapur,
दागिने लंपास करणाऱ्या दोन भामट्यांना अटक, ठाणे आणि मुंबईतील १६ गुन्हे उघडकीस
haryana school bus accident
हरियाणातील स्कूलबस अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; शाळेच्या मुख्यध्यापिकेसह तिघांना अटक
The crime branch police demanded a bribe of 10 lakhs crime news
गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली १० लाखांची लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
26 year old youth murdered in bibvewadi
पुणे: बिबवेवाडी येथे तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून

सुतार याला शहरातून तडीपार करण्यात आले आहे. तडीपारीचा आदेश भंग करुन तो शहरात आला होता. सिंहगड रस्ता भागातील वडगाव उड्डाणपुलाजवळ तो थांबला होता. त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहनचोरी विराेधी पथकाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा लावून पकडले. पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील, उपनिरीक्षक शाहिद शेख, बाळू गायकवाड, गणेश ढगे, रवींद्र लोखंडे आदींनी ही कारवाई केली.

हेही वाचा- पुणे: दुचाकी टॅक्सी, ‘आरटीओ’त न्यायालयीन वाद

दरम्यान, मुंढवा भागात आणखी एका तडीपार केलेल्या गुंडाला पकडण्यात आले. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला. सागर शंकर घोडके (वय २२, रा. कीर्तनेबाग, केशवनगर, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. घोडकेला तडीपार करण्यात आले होते. तो मगरपट्टा सिटी भागात थांबला होता. पोलिसांच्या पथकाने त्याला पकडले. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडले, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे, सहायक निरीक्षक संदीप जाेरे, दिनेश राणे, संतोष जगताप, दिनेश भांदुर्गे यांनी ही कारवाई केली.