पुणे : चाकणमधील मेफेड्रोन विक्री प्रकरणातील खटल्याच्या सुनावणीला खेड न्यायालयात सुरुवात झाली. या प्रकरणात अमली पदार्थ तस्कर ललित पाटील मुख्य आरोपी आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने खेड तालुक्यात ७ ऑक्टोबर २०२० रोजी २० किलो मेफेड्रोन (एमडी) जप्त केले होते. या प्रकरणात ललित पाटीलसह वीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून, त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणात आठ आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.  उर्वरित बारा आरोपी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. या खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ झाला असून, सरकार पक्षाकडून तक्रारदार पोलिस अधिकारी शाकीर जिनेरी यांची साक्ष नोंदविण्यात आली.

हेही वाचा >>> महाविकास आघाडीच्या या जागा धोक्यात, हे आहे कारण ! बंडखोरांना शांत करण्यात काँग्रेस नेत्यांना अपयश

What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Assembly Election 2024, Doctor, Manifesto
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर डॉक्टरांचा जाहीरनामा! राजकारण्यांकडे केलेल्या मागण्या जाणून घ्या…
Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
ajit pawar meet Prakash Ambedkar
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट, तब्येतीची केली विचारपूस
maharashtra vidhan sabha election 2024 congress leaders fails to get rebels to withdraw from pune seats
महाविकास आघाडीच्या या जागा धोक्यात, हे आहे कारण ! बंडखोरांना शांत करण्यात काँग्रेस नेत्यांना अपयश

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चाकण भागात एका मोटारीतून २० किलो मेफेड्रोन जप्त केले होते. तपासात आरोपींनी रांजणगाव येथील कंपनीत तब्बल १३२ किलो आणि रायगड जिल्ह्यातील महाड येथे दहा-पंधरा किलो मेफेड्रोन तयार केल्याची माहिती मिळाली होती.  या प्रकरणात पोलिसांनी अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलसह एकूण २२ जणांना अटक केली होती. याच गुन्ह्यात ललित पाटील ससून रुग्णालयात उपचार घेत असताना मेफेड्रोनची विक्री करत असल्याचे उघडकीस आले होते. पोलिसांनी आरोपींविरुद्ध २८ सप्टेंबर २०२१ रोजी खेड सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी मेफेड्रोन जप्त केले होते. न्यायालयात सादर केलेल्या नमुन्यांचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत रासायनिक विश्लेषण करण्यात आले नव्हते. अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (एनडीपीएस) तरतुदींची पूर्तता झाली नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाने आठ आरोपींना जामीन मंजूर केला होता. त्यामुळे पिंपरी पोलिसांच्या तपासावर टीका झाली होती.

Story img Loader