पुणे : बिल्डरच्या घरातून २३ लाखांचे हिऱ्यांचे दागिने लंपास; संशयावरून घरकाम करणारी महिला अटकेत

दागिने चोरीला गेल्याचे उघडकीस आल्यानंतर बिल्डरने पोलिसांकडे तक्रार दाखल केली, याच तक्रारीच्या आधारे कारवाई करण्यात आली

hadapsar police station
या प्रकरणात पोलिसांनी घऱकाम करणाऱ्या महिलेला अटक केलीय (प्रातिनिधिक फोटो)

मगरपट्टा सिटी भागात राहणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरातून २३ लाखांचे हिरेजडीत दागिने लांबविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकाच्या घरात काम करणाऱ्या महिलेला अटक केली.

राधा अशोक ‌झा (वय ३७, रा. वैदुवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत बांधकाम व्यावसायिकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राधा झा ही बांधकाम व्यावसायिकाच्या सदनिकेत काम करत होती. तिने लक्ष नसल्याची संधी साधून कपाटातील २३ लाख ५० हजारांचे हिरेजडीत सोन्याचे दागिने लांबविले असावेत कारण त्यानंतर राधा कामावर आली नाही, असे फिर्यादीचे म्हणणे आहे. दरम्यान, दागिने चोरीला गेल्याचे उघडकीस आल्यानंतर तक्रार देण्यात आली. राधाने दागिने चोरल्याचा संशय बांधकाम व्यावसायिकाने फिर्यादीत व्यक्त केला.

त्यानंतर पोलिसांनी तपास करून तिला अटक केली. न्यायालयाने राधाला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 23 lakh dimond jewelry theft at builders home pune print news scsg

Next Story
लाल महालात लावणी प्रकरण : अभिनेत्री वैष्णवी पाटीलवर गुन्हा दाखल
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी