वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणारे २३ रिक्षा थांबे बंद

हतुकीला अडथळा ठरणारे शहरातील २३ रिक्षा थांबे बंद करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांकडून घेण्यात आला आहे.

वाहतूक पोलिसांकडून रिक्षा थांब्यांची पाहणी

पुणे :  वाहतुकीला अडथळा ठरणारे शहरातील २३ रिक्षा थांबे बंद करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांकडून घेण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांनी शहरातील वेगवेगळय़ा भागात असणाऱ्या रिक्षा थांब्याची पाहणी केली, तेव्हा काही थांबे अनावश्यक ठिकाणी असल्याचे निदर्शनास आले. मात्र,नव्याने १३ रिक्षा थांबे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळय़ा भागांची पाहणी केली. प्रवाशांची सोय तसेच रिक्षा संघटनांचे मत जाणून घेण्यात आले, त्यापैकी २३ ठिकाणी असलेले थांबे अयोग्य ठिकाणी असल्याचे दिसून आले. या थांब्यांमुळे वाहतूक कोंडीही होत असल्याचे निदर्शनास आले. नवीन १३ ठिकाणी रिक्षा थांबे सुरू करण्याची गरज असल्याचे दिसून आले. त्या ठिकाणी नवीन रिक्षा थांबे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सांगितले.

वाहतूक पोलिसांनी शहरातील ५२ रिक्षा थांब्यांची पाहणी नुकतीच केली. रिक्षा थांब्यासाठीची उपलब्ध जागा, त्या रस्त्यावरील वाहतूक या बाबींचा विचार करण्यात आला. या पाहणीसाठी प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्यांची मदत घेण्यात आली.

शहरातील ज्या भागात वाहतूक कोंडी होते, अशा भागांची पाहणी करण्यात आली. काही रिक्षा थांबे अयोग्य ठिकाणी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हे रिक्षा थांबे बंद करण्यात येणार असून नव्याने १३ रिक्षा थांबे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

राहुल श्रीरामे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 23 rickshaw shops closed traffic ysh

Next Story
उसने पैसे वेळेत न दिल्यामुळे अंगावर अ‍ॅसिड टाकले
ताज्या बातम्या