scorecardresearch

मावशीने १०० रु दिले नाहीत म्हणून तरुणाने केली आत्महत्या..

आठ महिन्यांपूर्वी केली होती भावाने आत्महत्या

मावशीने १०० रु दिले नाहीत म्हणून तरुणाने केली आत्महत्या..

आठ महिन्यांपूर्वी केली होती भावाने आत्महत्या

मावशीने १०० रुपये देण्यास नकार दिल्याने तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शगुणन कुमार पी अस आत्महत्या केलेल्या २४ वर्षीय तरुणाचे नाव आहे. शगुणन हा काहीच काम करत नव्हता. शुक्रवारी दुपारी मावशीकडे शंभर रुपये मागितले ते देण्यास मावशीने नकार दिला. दररोज कुठून पैसे देऊ असे शगुणन ला ठणकावले याच रागातून त्याने दुसऱ्या मजल्यावरील खोलीत जाऊन गळफास घेत आत्महत्या केलीय.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शगुणन हा मूळ तामिळनाडू येथील असून तिकडेच त्याचे आई वडील वास्तव्यास आहेत. पिंपरीत तो मावशी आणि बहिणीसह राहण्यास आहे. मात्र, तो काही ही काम करत नसल्याने त्याला सतत मावशी किंवा बहिणीकडे पैसे मागावे लागत असे. शुक्रवारी देखील त्याने दुपारी मावशीकडे शंभर रुपये मागितले, पैसे देण्यास मावशीने नकार दिला. याच रागातून दुसऱ्या मजल्यावरील खोलीत जाऊन कुत्र्याच्या पट्टयाने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. दरम्यान, काही मिनिटांनी मावशी त्याला पाहायला गेली असता घटना उघड झाली आहे. शगुणन ची बहीण आयटी कंपनीत कामाला असून दुसऱ्या भावाने देखील आठ महिन्यांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. घटनेचा अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 24 years youth committed suicide after aunt refuse to give rs 100 zws

ताज्या बातम्या