पिंपरी: प्रेयसीला अपशब्द वापरला म्हणून पोटच्या मुलाने वडिलांचा गळा आवळून खून केला आहे. ही घटना दिघी येथे रविवारी (दि.५) रात्री उशीरा घडली. या प्रकरणी पोलिसांनी तरुणासह त्याच्या भावा आणि आईविरोधातही गुन्हा नोंदविला आहे.

हेही वाचा >>> पुणे- धुळवडीला मार्केट यार्डातील आंबेडकरनगरमध्ये गोळीबार, दोन गटात हाणामारी

Man Commits Suicide, Killing Second Wife , Killing Son, Immoral Relationship, nagpur crime, Immoral Relationship crime, nagpur news, murder news, crime news, marathi news,
नागपूर : अनैतिक संबंधामुळेच घडले हत्याकांड, तिघांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा
Boy killed for resisting unnatural act Sheel Daighar police arrests two
अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने मुलाची हत्या, शीळ डायघर पोलिसांनी केली दोघांना अटक
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप

अशोक रामदास जाधव (वय ४५) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. तर, मुख्य आरोपी अनिल अशोक जाधव (वय २३) यासह राहुल अशोक जाधव (वय २५) या मोठ्या भावालाही गजाआड करण्यात आले आहे.  त्यांच्या आईवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अनिल याचे एका मुलीशी प्रेमसंबंध आहेत. त्या मुलीविषयी वडिल अशोक यांनी अपशब्द वापरले. याचा राग आल्याने अनिलने घरातील दोरीने गळा आवळून वडिलांचा खून केला.

हेही वाचा >>> पुणे : पीएमआरडीएच्या गृहयोजनेतील सदनिकांची होणार ई-नोंदणी 

घटनेनंतर त्याच्या आईने फरशीवर पडलेले रक्ताचे डाग पुसत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तर, अनिलचा मोठा भाऊ अशोक याने वडिलांचा मृतदेह घरातील छताच्या पंख्याला अडकवून आत्महत्या केल्याचा बनाव रचला. या खूनप्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत.