scorecardresearch

Premium

पुणे: गुन्हेगारीवर वचक,वाहतूक नियोजनासाठी शहरात २८०० सीसीटीव्ही कॅमेरे; पोलीस महासंचालकांची घोषणा

पुणे शहर परिसरात महापालिका, पुणे पोलिसांनी १४०० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. शहरातील ज्या भागात गंभीर गुन्हे घडले आहे, तसेच महत्वाच्या ठिकाणी अतिरिक्त २८०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील महत्वाचा परिसरावर पोलिसांनी नजर राहील, अशी माहिती पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिली. वानवडीतील रामटेकडी परिसरातील राज्य राखीव पोलीस दलात आयोजित करण्यात आलेल्या एका […]

cctv for traffic planning in pune
(संग्रहित छायाचित्र) लोकसत्ता टीम

पुणे शहर परिसरात महापालिका, पुणे पोलिसांनी १४०० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. शहरातील ज्या भागात गंभीर गुन्हे घडले आहे, तसेच महत्वाच्या ठिकाणी अतिरिक्त २८०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील महत्वाचा परिसरावर पोलिसांनी नजर राहील, अशी माहिती पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिली.

वानवडीतील रामटेकडी परिसरातील राज्य राखीव पोलीस दलात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमास पोलीस महासंचालक रजनीश सेठ आले होते. पोलीस महासंचालकांनी पुणे पोलीस आयुक्तालयास भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक आदी यावेळी उपस्थित होते.

harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
Parineeti troll
“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
sharad pawar narendra modi (1)
“पंतप्रधान मोदींचं ‘ते’ विधान क्लेशदायक”, शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका; दिले १९९३ च्या घडामोडींचे दाखले!

हेही वाचा >>> दहावी, बारावीचा पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये; राज्य मंडळाकडून वेळापत्रक जाहीर

पुणे शहर परिसरात महापालिका आणि पोलिसांनी यापूर्वी १४०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. वाहतुकीच्या नियोजनासाठी १४०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. शहरातील गंभीर गुन्हे आणि घडामोडींवर पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवतात. शहरातील ज्या भागात गंभीर गुन्हे, तसेच अपघात घडले आहेत. अशा भागांची माहिती पोलिसांनी घेतली. गेल्या दहा वर्षात शहरात घडलेल्या गंभीर गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर शहरात नव्याने २८०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस महासंचालक सेठ यांनी सांगितले.

शहरातील गुन्हेगारी आणि वाहतुकीच्या नियोजनासाठी नव्याने २८०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू आहे. शहरातील महत्वाच्या १२४ चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहे. उर्वरित १३५ सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील महत्वाच्या संस्था, व्यावसायिकांचे सहाय घेण्यात येणार आहे. महत्वाच्या संस्था, व्यावसायिक, दुकानदारांनी त्यांचे कॅमेरे रस्त्याच्या दिशेने लावल्यास त्याचा निश्चित उपयोग होईल. महत्वाच्या संस्था, व्यावासायिक, दुकानदारांनी बसवलेले दहा हजार सीसीटीव्ही कॅमेरे पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी जोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे, असे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा >>> भीमा-कोरेगाव प्रकरणात फडणवीस यांना चौकशीला बोलवणे, आठवलेंच्या तर्काने सर्वच चकीत

खंडणीखोरांवर कडक कारवाई पुणे शहर, जिल्ह्यात मोठ्या ओैद्याेगिक कंपन्या आहेत. माथाडी संघटनांच्या नावाखाली खंडणी उकळण्याचे प्रकार घडले आहेत. पुणे जिल्ह्यातील उद्योजकांची बैठक घेऊन खंडणीची मागणी केल्यास त्वरीत तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.उद्योजकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या आहेत. उद्योजकांनी न घाबरता पोलिसांकडे तक्रार करावी. खंडणीखोरांच्या विरोधात पोलीस कडक कारवाई करतील, असा इशारा पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-06-2023 at 22:52 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×