पुणे शहर परिसरात महापालिका, पुणे पोलिसांनी १४०० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. शहरातील ज्या भागात गंभीर गुन्हे घडले आहे, तसेच महत्वाच्या ठिकाणी अतिरिक्त २८०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील महत्वाचा परिसरावर पोलिसांनी नजर राहील, अशी माहिती पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिली.
वानवडीतील रामटेकडी परिसरातील राज्य राखीव पोलीस दलात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमास पोलीस महासंचालक रजनीश सेठ आले होते. पोलीस महासंचालकांनी पुणे
हेही वाचा >>> दहावी, बारावीचा पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये; राज्य मंडळाकडून वेळापत्रक जाहीर
पुणे शहर परिसरात महापालिका आणि पोलिसांनी यापूर्वी १४०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. वाहतुकीच्या नियोजनासाठी १४०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. शहरातील गंभीर गुन्हे आणि घडामोडींवर पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवतात. शहरातील ज्या भागात गंभीर गुन्हे, तसेच अपघात घडले आहेत. अशा भागांची माहिती पोलिसांनी घेतली. गेल्या दहा वर्षात शहरात घडलेल्या गंभीर गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर शहरात नव्याने २८०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस महासंचालक सेठ यांनी सांगितले.
शहरातील गुन्हेगारी आणि वाहतुकीच्या नियोजनासाठी नव्याने २८०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू आहे. शहरातील महत्वाच्या १२४ चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहे. उर्वरित १३५ सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील महत्वाच्या संस्था, व्यावसायिकांचे सहाय घेण्यात येणार आहे. महत्वाच्या संस्था, व्यावसायिक, दुकानदारांनी त्यांचे कॅमेरे रस्त्याच्या दिशेने लावल्यास त्याचा निश्चित उपयोग होईल. महत्वाच्या संस्था, व्यावासायिक, दुकानदारांनी बसवलेले दहा हजार सीसीटीव्ही कॅमेरे पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी जोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे, असे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा >>> भीमा-कोरेगाव प्रकरणात फडणवीस यांना चौकशीला बोलवणे, आठवलेंच्या तर्काने सर्वच चकीत
खंडणीखोरांवर कडक कारवाई पुणे शहर, जिल्ह्यात मोठ्या ओैद्याेगिक कंपन्या आहेत. माथाडी संघटनांच्या नावाखाली खंडणी उकळण्याचे प्रकार घडले आहेत. पुणे जिल्ह्यातील उद्योजकांची बैठक घेऊन खंडणीची मागणी केल्यास त्वरीत तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.उद्योजकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या आहेत. उद्योजकांनी न घाबरता पोलिसांकडे तक्रार करावी. खंडणीखोरांच्या विरोधात पोलीस कडक कारवाई करतील, असा इशारा पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिला.
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2800 cctv cameras in pune city for traffic planning says maharashtra dgp rajnish seth pune print news rbk 25 zws