पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील दुसरी गुणवत्ता यादी आज (१० जुलै) जाहीर होणार आहे. पहिल्या फेरीत ३८ हजार ८९० विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर होऊनही जेमतेम निम्म्याच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यामुळे दुसऱ्या फेरीत किती विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर होतो, याकडे लक्ष लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 यंदा अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत ३४० महाविद्यालयांमध्ये १ लाख १९ हजार ७०५ जागा उपलब्ध आहेत. त्यातील ९३ हजार ३४६ जागा केंद्रीय प्रवेशांसाठी (कॅप), तर २६ हजार ३५९ जागा कोटा प्रवेशांसाठी आहेत. दुसऱ्या फेरीपर्यंत विद्यार्थ्यांची नोंदणीमध्ये वाढ झाली असून ९९ हजार १७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. आतापर्यंत केंद्रीय प्रवेश (कॅप) आणि राखीव जागा (कोटा) मिळून २५ हजार ३७२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. तर अद्याप ९४ हजार ३३३ जागा रिक्त आहेत.

हेही वाचा >>>पुणे: पावसानेच घेतली सुट्टी!

या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी आज (१० जुलै) जाहीर करण्यात येणार आहे. या फेरीत प्रवेश जाहीर होणाऱ्या विद्यार्थ्यांना १२ जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे अनिवार्य आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्यास त्यांना पुढील फेरीत सहभागी होता येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2nd merit list in 11th admission process tomorrow pune print news ccp 14 amy
Show comments