पुणे : अज्ञात वाहनाने ३३ केव्ही डबलसर्किट वीजवाहिन्यांच्या खांबाला रविवारी (१९ मार्च) पहाटे एकच्या सुमारास धडक दिली. यामध्ये वीजखांबासह वाहिन्या जमीनदोस्त झाल्या. त्यामुळे चाकण एमआयडीसी परिसरातील ३० उद्योगांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर महावितरणकडून तातडीने पर्यायी वीजपुरवठ्यासाठी तांत्रिक उपाययोजना करून दुपारी सर्व औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू केला.

हेही वाचा >>> खळबळजनक: प्रेमी युगलाला रिक्षात अश्लील चाळे करताना हटकले, प्रियकराने रिक्षा चालकाची केली हत्या

thane, traffic route changes marathi news, namo central park marathi news
नमो सेंट्रल पार्क परिसरात मोठे वाहतूक बदल; शनिवार, रविवार या दिवशीच लागू असणार बदल, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना
Agitation on behalf of Vanchit Bahujan Aghadi yavatmal
“रिकामी माझी घागर…” पाणी समस्या सोडविण्यासाठी ‘वंचित’चे असेही आंदोलन…
Maha Metro, Nagpur, decrease, Metro fare, 33 percent, March 1 2024,
नागपूरकरांसाठी गुड न्यूज, मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त
Criminal action in case of beating of MSEDCL employees
महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यास महागात पडणार

महापारेषणच्या चाकण १३२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातून ह्युंदाई-कॉर्निंग ३३ केव्ही डबल सर्किट वीजवाहिनीद्वारे चाकण एमआयडीसी फेज दोनमधील उद्योगांना वीजपुरवठा केला जातो. मात्र, या वीजवाहिनीच्या खांबाला आंबेठाण रस्त्यावर अज्ञात वाहनाने पहाटे एकच्या सुमारास धडक दिली. नंतर चालक वाहनासह पळून गेला. मात्र, या धडकेत वीजखांब व डबल सर्कीटच्या वीजवाहिन्या जमीनदोस्त झाल्याने चाकणमधील ३० उद्योगांचा वीजपुरवठा खंडित झाला.

महावितरणचे उपकार्यकारी अभियंता विजय गारगोटे, शाखा अभियंता रामप्रसाद नरवडे, जनमित्र योगेश जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन इतर वीजवाहिन्यांद्वारे पर्यायी वीजपुरवठ्याची तयारी सुरु केली. तांत्रिक उपाययोजना झाल्यानंतर सर्वच ३० उद्योगांचा वीजपुरवठा दुपारी पर्यायी व्यवस्थेतून सुरू करण्यात आला.

हेही वाचा >>> कोरेगाव पार्क भागात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; चार परदेशी महिलांसह सातजणी ताब्यात

जमीनदोस्त झालेल्या वीजखांबाची उभारणी, वीजवाहिन्यांची जोडणी तसेच डिस्क इन्सूलेटर बदलण्यासह इतर कामे सुरु करण्यात आले असून सायंकाळपर्यंत सर्व कामे पूर्ण होणार आहेत. दरम्यान, वीजखांबाला धडक देऊन नुकसान करणाऱ्या अज्ञात वाहनचालकाविरुद्ध महावितरणकडून फौजदारी फिर्याद दाखल करण्यात येत आहे.