चिंचवड येथील मैलाशुद्ध्रीकरण केंद्राच्या नूतनीकरणासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने तब्बल ३१ कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला पालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी प्रशासकीय बैठकीत मान्यता दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चिंचवड भाटनगर येथील मैलाशुद्ध्रीकरण केंद्राची क्षमता वाढवण्यासाठी या केंद्राचे नूतनीकरण करण्याचा निर्णय पालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाने घेतला. त्यानुसार नूतनीकरणाच्या कामासाठी १८ जुलै २०२२ रोजी निविदा मागवण्यात आल्या. या स्पर्धेत तीन जणांच्या निविदा पात्र ठरल्या. त्यापैकी ३१ कोटी ६१ लाख रूपये खर्चाची घारपुरे इंजिनिअरिंग कंपनीची निविदा मंजूर करण्यात आली आहे. या नूतनीकरणाच्या कामाचा कालावधी २४ महिने असणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 31 crore for renovation of chinchwad sewage treatment plant pune print news amy
First published on: 30-11-2022 at 20:30 IST