पिंपरीः जागेचे खरेदीखत करताना भोसरीतील एका महिलेची ३२ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक करण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी संबंधित महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. भोसरी पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे २०१९ ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत फसवणुकीचा प्रकार घडला आहे. आरोपींनी भोसरीतील सर्व्हे क्रमांक १३७ येथील जागेचे खरेदी खत करून देतो म्हणून फिर्यादीकडून वेगवेगळ्या माध्यमातून ३२ लाख ५० हजार रूपये घेतले. मात्र, दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखत करून दिले नाही व इतर आवश्यक कागदोपत्री कार्यवाही पूर्ण केली नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याची तक्रार  महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात केली आहे. त्यानुसार, एका महिलेसह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खाडे करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 32 lakh fraud of a woman in bhosari woman complained police pune print news ysh
First published on: 30-11-2022 at 18:05 IST