३६ व्या पुणे आंतरराष्ट्रीय नाईट मॅरेथॉन स्पर्धेला पुण्यात सुरुवात झाली. या स्पर्धेला कारगिलच्या लडाख स्वायत्त हिल विकास परिषदेचे चेअरमन अहमद खान यांच्या हस्ते सारसबागेजवळील सणस मैदान येथे हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. ३६ व्या पुणे आंतरराष्ट्रीय नाईट मॅरेथॉन स्पर्धेत दरवर्षीप्रमाणे यंदा देखील इथिओपियाच्या स्पर्धकांनी बाजी मारली असून प्रथम क्रमांक लेटा तेस्फाये गुटेटा, द्वितीय क्रमांक उर्गा केबुबे आणि तृतीय क्रमांक यीबेगता झेंगेटा यांनी पटकावला.

मॅरेथॉन स्पर्धेच्या उद्घटनावेळी राज्यसभा खासदार वंदना चव्हाण, आमदार सुनील कांबळे, माजी आमदार रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, कार्यक्रमाचे संयोजक अभय छाजेड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होते. दरवर्षी प्रमाणे यंदा देखील विविध देशातील स्पर्धक मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाले होते. ४२.१९५ किमी फुल मॅरेथॉन स्पर्धेला रात्री १२ वाजता सुरुवात झाली.

Mr. Gay Nepal 2024
‘मिस्टर गे नेपाळ २०२४’ चा किताब लक्ष्मण मगर यांनी जिंकला; आता लंडनमध्ये करणार प्रतिनिधित्व
candidates chess gukesh beat abasov
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश पुन्हा संयुक्त आघाडीवर; प्रज्ञानंदने नेपोम्नियाशीला बरोबरीत रोखले; कारुआनाकडून विदितचा पराभव
Candidates Chess Tournament D Gukesh defeated Fabiano Caruana
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: गुकेश अपराजितच! अग्रमानांकित कारुआनाला बरोबरीत रोखले; विदित, हम्पी पराभूत
national boxing championship marathi news
नागपूरच्या समीक्षा, अनंतने जिंकले राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक

हेही वाचा: पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेसच्या डब्याखालून धूर; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

सणस मैदान चौक, सारस बाग, सिंहगड मार्ग, नांदेड सिटी, आतील सर्कलला वळसा घालून त्याच मार्गे सणस मैदान ही एक फेरी आणि अशीच दुसरी फेरी घेण्यात येणार आहे. महिला २१ किलोमीटर अर्ध मॅरेथॉन स्पर्धेला १२ वाजून ३० मिनिटांनी सुरुवात झाली. महालांची मॅरेथॉन स्पर्धा सुद्धा त्याच मार्गाने एक फेरी पूर्ण करणार आहे. त्यानंतर सकाळी ६वाजता १० किमी, ६ वाजून ३० मिनिटांनी ५ किमी आणि ७ वाजता ३ किमी अशी देखील मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतील सर्व विजेत्यांना पुणे महानगरपालिकेमार्फत ३५ लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत .