मिळकत करातील चाळीस टक्के सवलत कायम ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुंबईतील बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला. मंत्रीमंडळाच्या पहिल्या बैठकीत तसा प्रस्ताव ठेवून त्याला तातडीने मान्यता देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सुमारे एक लाख मिळकतधारकांना दिलासा मिळणार आहे. मिळकतकरात वर्षानुवर्षे मिळणारी ४० टक्क्यांची सवलत कायम ठेवण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी मुंबई येथे बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय झाला.

हेही वाचा >>>पिंपरी: हिंजवडीत सराईत गुन्हेगार निलेश गायवळचे फलक; गुन्हा दाखल

nashik, malegaon, clerk arrested, ration office, Accepting Bribe, Register Needy Families, Welfare Schemes, malegaon bribe case,
नाशिक : लाच स्वीकारताना कारकुनास अटक
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
The crime branch police demanded a bribe of 10 lakhs crime news
गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली १० लाखांची लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
26 year old youth murdered in bibvewadi
पुणे: बिबवेवाडी येथे तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून

पुणे महानगरपालिकेमार्फत मुख्य सभेने ३ एप्रिल १९७० मध्ये मिळकत कराची आकारणी करताना घरमालक स्वतः राहात असलेल्या जागेचे भाडे वाजवी भाड्याच्या ६० टक्के इतके धरून ४० टक्के सवलत तसेच सर्व मिळकतींना करपात्र रक्कम ठरविताना १० टक्क्यां ऐवजी १५ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. महापालिकेच्या झालेल्या सन २०१०-१२ च्या लेखापरीक्षणामध्ये दहा टक्क्यांऐवजी ऐवजी पंधरा टक्के सवलत देणेबाबत आक्षेप नोंदविण्यात आला होता. तसेच त्यावर लोकलेखा समितीच्या बैठकीमध्ये चर्चा होऊन त्यानुसार प्राप्त आदेशानुसार शासनाने १ ऑगस्ट २०१९ च्या निर्णयानुसार ठरावाचे विखंडन केले होते.ठराव विखंडित झाल्यामुळे कर आकारणी आणि कर संकलन कार्यालयाने शहरातील ज्या मिळकत धारकांना ४० टक्के सवलत देण्यात आलेली आहे, अशा मिळकतींची सवलत १ ऑगस्ट २०१९ पासून रद्द करून फरकाची देयके पाठविली आहेत.

हेही वाचा >>>पुणे: एक दशकापासून कागदावरच राहिलेल्या रस्त्यासाठी स्थानिक रहिवाशांची मुंबई उच्च न्यायालयात धाव !

सवलतीची वसुली पूर्वलक्ष्यी प्रभावाने वसुली होणार असल्याने त्याचा ९९ हजार मिळकतधारकांना फटका बसला आहे.मिळकतकराची सवलत रद्द करण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह अन्य पक्षांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता. भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळानेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी यासंदर्भात बैठक घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिले होते. १ ऑगस्ट २०१९ पासून स्वतः वापर करीत असलेल्या निवासी मिळकतीची ४० टक्के सवलत काढण्यात येऊ नये, १ एप्रिल २०१० पासूनची देखभाल दुरूस्ती खर्चाची १५ टक्क्यांहून १० टक्क्यांपर्यंत फरकाची रक्कम वसूल करण्यात येऊ नये, या मागण्यां मान्य झाल्या आहेत.