पुण्यामध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. पोलिसांनी पुण्यामधील एका २५ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. या तरुणाच्या मोबाईलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पॉर्नोग्राफिक साहित्य आढळून आलं आहे. यामध्ये पॉर्न व्हिडीओ आणि फोटोंचा समावेश आहे. शुभम अवदे असं या तरुणाचं नावं असून तो त्याच्या शेजारी राहणाऱ्या महिलांचे फोटो एडीट करुन पॉर्न व्हिडीओ बनवायचा अशी माहिती समोर आलीय. प्राथमिक तपासामध्ये शुभम मागील सहा महिन्यांपासून हे असे पॉर्न व्हिडीओ बनवत असल्याची माहिती समोर आलीय. या तरुणाच्या मोबाईलमध्ये पाच हजार फोटोही सापडले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या महिलांचे फोटो शुभमने एडीट करुन पॉर्न व्हिडीओ बनवण्यासाठी वापरलेत त्या सर्व स्थानिक महिलाच आहे. हे व्हिडीओ शुभमने सोशल मीडियावर पोस्ट केले होते का याचाही तपास पोलीस करत आहेत. सध्या या प्रकरणामध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
civil service servants vehicle with a board coming to wrong side
चक्क अधिकाऱ्याच्या गाडीने मोडला वाहतूक नियम! भर रस्त्यावर थांबवताच पेटला वाद, पाहा VIDEO
Viral Video of Mother's Phone Addiction
बापरे! मोबाईलच्या नादात महिलेने चिमुकल्याला फ्रिजमध्ये ठेवले? व्हायरल व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
girl playing holi with boyfriend while standing on moving scooter
चालत्या स्कुटीवर उभे राहून तरुणाला रंग लावत होती तरुणी! अचानक ब्रेक दाबला अन्…. व्हिडीओमध्ये बघा पुढे काय घडले

पुणे मिररने दिलेल्या वृत्तानुसार या सर्व प्रकरणाची माहिती शुभमच्या मित्राने तक्रार दाखल केल्यानंतर समोर आलीय. “राजीव गांधी नगरमध्ये राहणारा शुभम आणि मी नेहमी बोलायचो. एकदा तो आम्हाला त्याच्या मोबाईलमध्ये फोटो दाखवताना आम्ही त्याच्या मोबाईलमधील फोटो गॅलरी पाहिली. त्यामध्ये असे शेकडो अश्लील फोटो आणि व्हिडीओ होते. त्यावेळी आम्हाला लक्षात आलं की हे फोटो मॉर्फ केलेले असून आपल्या परिसरामध्ये आजूबाजूला राहणाऱ्या महिलांचेचे फोटो वापरुन हे व्हिडीओ बनवण्यात आलेत. यासंदर्भात त्याला जाब विचारला असता त्याने उत्तर देण्यास टाळाटाळ केली. आमच्यासोबतच्या मुलींना त्याच्या फोनमधील ते फोटो पाहून मोठा धक्काच बसला. त्यानंतर आम्ही तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला,” असं तक्रारदाराने म्हटलंय.

याच परिसरामध्ये राहणाऱ्या एका महिलेचा फोटो तिच्या मैत्रिणीने शुभमने एडीट केलेल्या या अश्लील व्हिडीओंमध्ये पाहिला तेव्हा तिला धक्काच बसला. “त्याने तो फोटो माझ्या मैत्रिणीच्या सोशल नेटवर्किंगवरुन घेतलाय. मला ही माहिती त्याच्या ओळखीतील त्याच्या एका चांगल्या मित्रानेच दिलीय,” असं ही तरुणी म्हणाली.

या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती खडकी पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिलीय. कलम ३५४ (अ) (महिलांच्या चरित्र्यावर शिंतोडे उडवणे किंवा तशी वर्तवणूक करणे), ४६९ (एखाद्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचवण्याच्या उद्देशाने त्याची फसवणूक करणे) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.