पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने १८९१ रुग्ण आढळल्याने १ लाख २८ हजार ४२३ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात ४४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आज अखेर ३ हजार ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्या १९२६ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर १ लाख ८ हजार १२३ रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.
पिंपरीत ८४३ नवे रुग्ण
पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ८४३ जण करोना बाधित रुग्ण आढळले असून २१ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, ८६२ जण करोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या ६८ हजार ४३९ वर पोहचली असून पैकी ५४ हजार २२५ जण करोनातून बरे झाले आहेत. महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार ५२२ एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे
