पुण्यात दिवसभरात ४६ करोनाबाधितांचा मृत्यू; आढळले १७८९ नवे रुग्ण

पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले ८७२ करोनाबाधित रुग्ण

(संग्रहित छायाचित्र)

पुणे शहरात दिवसभरात नव्याने १७८९ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या १ लाख ३५ हजार ८१८ एवढी झाली आहे. तर दिवसभरात ४६ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आज अखेर ४ हजार २१३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

करोनावर उपचार घेणार्‍या १५१२ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर १ लाख १५ हजार २९८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

तर पिंपरी-चिंचवडमध्ये आज दिवसभरात नव्याने ८७२ करोनाबाधित रुग्ण आढळले असून १६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, ५५७ जण आज करोनातून बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ७२ हजार ४७६ वर पोहचली असून यांपैकी, ५८ हजार ३९६ जण करोनामुक्त झाले आहेत. महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार १९७ एवढी आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 46 crore victims die in pune in a day 1789 new patients found aau

ताज्या बातम्या