पुणे : लष्करी अधिकारी असल्याच्या बतावणीने सायबर चोरट्याने कोथरुड भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची पाच लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर चोरट्याविरुद्ध कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याबाबत एका ज्येष्ठाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एका बंँक खातेधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कोथरुडमधील गुरुगणेशनगर भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. डिसेंबर महिन्यात चाेरट्याने ज्येष्ठाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्याने लष्करात अधिकारी असल्याची बतावणी केली. कोथरूड भागात सदनिका भाडेतत्त्वावर घ्यायची आहे, अशी बतावणी केली. त्यानंतर चोरट्याने त्यांना अनामत रक्कम पाठवितो, असे त्यांना सांगितले.

attempt of murder wagholi pune five arrested crime news
वैमनस्यातून तरुणाला बेदम मारहाण करुन खुनाचा प्रयत्न, वाघोलीतील घटना; पाच जण अटकेत
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
when dcm ajit pawar points an ak 47 rifle at media representatives
माध्यम प्रतिनिधींवर उपमुख्यमंत्री अजित पवार ‘एके-४७’ बंदूक रोखतात तेव्हा…
twist in Akshay Shinde case, Badlapur sexual assault Accused shinde parents demand to mumbai high court for closure of case
अक्षय शिंदे प्रकरणात नवे वळण : प्रकरण पुढे लढायचे नाही, ते बंद करा, आरोपी अक्षय शिंदे याच्या आईवडिलांची उच्च न्यायालयात मागणी
Shanti Nagar police arrested gang diverting cyber fraud money into accounts of unemployed individuals
सायबर गुन्हेगारांचे पैसे अशिक्षित, बेरोजगारांच्या खात्यात, भिवंडी शहरातून सायबर गुन्हे करणारी टोळी गजांआड
SIT probes conspiracy against Devendra Fadnavis Eknath Shinde Mumbai news
फडणवीस, शिंदेंविरोधातील कारस्थानाची ‘एसआयटी’ चौकशी; खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे प्रकरण
Devendra Fadnavis On Ramdas Kadam
मविआच्या काळात फडणवीस-शिंदेंना अटक करण्याचा कट रचला गेला का? महायुती सरकारकडून तपासासाठी SIT स्थापन
cyber crime rising and engineers students and educated citizens becoming victim
सायबर गुन्हेगारांच्या ‘जाळ्यात’ उच्च शिक्षितच; गेल्या वर्षभरात किती तक्रारी?

हेही वाचा – उच्च शिक्षणात आता कौशल्य अभ्यासक्रमांवर भर; ‘यूजीसी’कडून मार्गदर्शक सूचनांचा मसुदा प्रसिद्ध

चोरट्याने ज्येष्ठाच्या बँक खात्याची माहिती घेतली. बँक खात्याच्या माहितीचा गैरवापर करुन चोरट्याने ज्येष्ठाच्या खात्यातून पाच लाख ३५ हजार २०० रुपये चोरुन नेले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने फिर्याद दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने तपास करत आहेत.

हेही वाचा – आयोगामार्फत प्राध्यापक भरतीस नकार; प्रचलित नियमांनुसारच प्रक्रिया राबवण्याच्या ‘यूजीसी’च्या सूचना

कोथरुड भागातील एकाची २९ लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांनी कोथरुड भागातील आणखी एकाची फसवणूक केली. शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी २९ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्याने तक्रारदाराच्या मोबाइलवर संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्याने त्यांना दाखविले. तक्रारदाराला समाज माध्यमातील एका समुहात सहभागी करुन घेतले. परताव्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले. तक्रारदाराने चोरट्याच्या बँक खात्यात २९ लाख ४० हजार रुपये जमा केले. चोरट्याने त्याचा मोबाइल क्रमांक बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम तपास करत आहेत.

Story img Loader