लटकणारा मांजा एका चिमुकल्याच्या डोळ्यात घुसल्याने त्याच्या दोन्ही डोळ्यांना गंभीर इजा झाली आहे. पिंपरीतील काळेवाडी भागात ही घटना घडली आहे. पतंगाचा मांजा लटकत होता त्याचवेळी नातेवाईकासोबत दुचाकीवर बसून हा चिमुकला घरी निघाला होता. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास लटकणारा मांजा या मुलाच्या डोळ्यात घुसला आणि तो खाली पडला. हा मांजा या मुलाला आणि त्याच्या नातेवाईकाला दिसला नसल्याने हा अपघात घडला. या अपघातात चिमुकल्याच्या डोळ्यांना गंभीर इजा झाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी लहान मुलाला  खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणात पोलिसांनी तक्रार दाखल केली नसल्याने जखमी मुलाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. मागील वर्षी म्हणजेच २५ जानेवारी २०१७ रोजी थेरगाव येथे पतंग उडवताना मांजा विद्युत तारांमध्ये अडकल्याने झटका बसून ५ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला होता.ही घटना थेरगाव मधील पडवळनगर येथे घडली होती.

Expired chocolate
एक्स्पायरी डेट उलटलेलं चॉकलेट खाल्ल्यानंतर दीड वर्षाच्या मुलीला रक्ताच्या उलट्या; दुकानावर कारवाई
couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
child who fell into the open canal rescued
सोलापूर: उघड्या कूपनलिकेत पडलेल्या बालकास सुखरूप बाहेर काढण्यास यश
Four Year Old Girl Tortured in Hadapsar Pune
धक्कादायक : खाऊच्या आमिषाने चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार