पुणे : चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी रविवारी अपवाद वगळता शांततेत, सुरळीत आणि उत्साहाच्या वातावरणात मतदान पार पडले. नवोदित मतदारांसह युवक, युवती, पुरुष, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच इतर मतदारांनी आज आपला मताधिकार बजावला असून या पोटनिवडणुकीसाठी ५०.४७ टक्के इतके सरासरी मतदान झाले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात झाली होती. सकाळी नऊ वाजेपर्यंत ३.२५ टक्के मतदान झाले. सकाळी ११ वाजेपर्यंत १०.४५ टक्के, दुपारी एकपर्यंत २०.६८ टक्के, दुपारी तीन वाजेपर्यंत ३०.५५ टक्के, तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४१.०६ टक्के मतदान झाले होते. अखेरच्या एका तासांत म्हणजेच सायंकाळी सहा वाजेपर्यंत ५०.४७ टक्के मतदान झाले. सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात ५५.८८ टक्के मतदान झाले होते. सकाळी आणि दुपारच्या सत्रात चिंचवडमध्ये मतदार फारसे बाहेर पडले नसल्याचे चित्र होते. मात्र, अखेरच्या टप्प्यांत मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढण्यात उमेदवारांना यश मिळाल्याचे दिसून आले.

Election Commission has released the polling data for the five phases of the Lok Sabha elections
गडचिरोलीत सर्वाधिक, दक्षिण मुंबईत सर्वात कमी; लोकसभा निवडणुकीच्या पाच टप्प्यांतील मतदानाची आकडेवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर
Most candidates in the fray for the first time since 1996 8360 candidates in the Lok Sabha elections
१९९६ नंतर प्रथमच सर्वाधिक उमेदवार रिंगणात; लोकसभा निवडणुकीत ८,३६० उमेदवार
Narendra Modi Lok Sabha election strategy
VIDEO : नरेंद्र मोदींची लोकसभा निवडणुकीची रणनिती काय? भाजपा ४०० पार होणार? गिरीश कुबेर यांचे विश्लेषण
Nagpur, voting, BJP,
नागपूर : मतदानानंतर तब्बल २५ दिवसांनी भाजपचा मतदार यादीवर आक्षेप, काय आहे प्रकरण?
Dhule lok sabha, BJP,
मतदारसंघाचा आढावा : धुळे; विरोधी मतांचे विभाजन टळल्याने भाजपपुढे आव्हान
About 58 percent voting in Osmanabad Lok Sabha Constituency
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५८ टक्के मतदान
voter turnout in the first two phases in maharashtra
Lok Sabha Election 2024 : पहिल्या दोन टप्प्यांत राज्यात गेल्या वेळीइतकेच मतदान
akshay bam
सूरतपाठोपाठ इंदूरमध्ये माघारनाट्य, काँग्रेस उमेदवाराकडून अर्ज मागे ; लोकशाहीला धोका असल्याचा पक्षाचा आरोप

हेही वाचा – Loksatta Pune Vardhapan Din 2023 : पोलीस दलाचे सक्षमीकरण गरजेचे

हेही वाचा – मतदान कालावधी संपला, कसब्यात रांगाच रांगा; मतदानाची टक्का वाढणार का?

चिंचवड विधानसभा या मतदारसंघामध्ये एकूण पाच लाख ६८ हजार ९५४ मतदार आहेत. एकूण ५१० मतदार केंद्रांवर मतदान झाले. यापैकी मतदारसंघातील २५५ मतदान केंद्रांवर चित्रीकरणाच्या सहाय्याने लक्ष ठेवण्यात आले होते. निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी थेरगाव येथील शंकरआण्णा गावडे कामगार भवनमध्ये नियंत्रण कक्ष उभारण्यात आला होता. या कक्षातून संपूर्ण मतदान प्रक्रियेवर, तसेच यंत्रणेवर निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले लक्ष ठेवून होते. कोणत्याही मतदार केंद्रावर उद्भवलेल्या अडचणी सोडवण्यासाठी, तसेच मदतीसाठी शीघ्र कृती दलाचे ( क्विक रिस्पॉन्स टीम ) सात पथके कार्यरत होती. ईव्हीएममध्ये तांत्रिक अडचण उद्भवल्यास शीघ्र कृती दल तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन निर्माण झालेली तांत्रिक अडचण दूर करत होते. त्यामुळे मतदान प्रक्रियेला कुठेही बाधा आली नाही. प्रत्येक केंद्राच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यासाठी ३७०७ पोलीस कर्मचारी व ७२५ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, मतदान प्रक्रिया संपल्यानंतर थेरगाव येथील शंकरआण्णा गावडे कामगार भवन येथे मतदान साहित्य जमा करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.