पुणे : विद्यापीठ कायद्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळाच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत ५१ हजार जणांनी नावनोंदणी केली आहे. या नोंदणी प्रक्रियेसाठी विद्यापीठाने मुदतवाढ दिली असून, पदवीधरांना १४ जुलैपर्यंत, प्राचार्य, शिक्षक व विभागप्रमुख यांना १३ जुलैपर्यंत तर संस्था प्रतिनिधी मतदारसंघासाठी १० जुलैपर्यंत नोंदणी करता येणार येईल. विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाची निवडणूक प्रक्रिया १ जूनपासून सुरू झाली आहे. या प्राधिकरणाची मुदत पुढील पाच वर्षांसाठी असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मतदारांच्या नोंदणीसाठी विद्यापीठाने election.unipune.ac.in हे वेब पोर्टल तयार केले आहे. या माध्यमातून पदवीधरासह विविध घटकांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करता येईल. या प्रक्रियेत जुन्या मतदारांनाही पुन्हा नोंदणी करणे आवश्यक असते. विद्यापीठाने यापूर्वी नावनोंदणी प्रक्रियेत पदवीधरांना ४ जुलै, शिक्षक, प्राचार्य आणि विभागप्रमुखांना ३ जुलै, संस्था प्रतिनिधींना ३० जूनची मुदत दिली होती. मात्र या नोंदणीसाठी विद्यापीठाने मुदतवाढ दिली आहे. पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नाही असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 51 000 people have registered for the university board of elections savitribai phule pune university pune print news amy
First published on: 01-07-2022 at 20:41 IST