पुणे : एका ५३ वर्षीय व्यक्तीच्या अवयवदानामुळे तीन जणांचे जीव वाचवण्यात आले. या व्यक्तीचे यकृत आणि दोन मूत्रपिंडांचे दान करण्यात आले. यामुळे तीन जणांना या अवयवांचे प्रत्यारोपण करण्यात आले. त्यातून या तिघांना जीवदान मिळाले आहे.
पिंपरीतील डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नरेंद्र (नाव बदलले आहे) या रुग्णाला १४ सप्टेंबरला दाखल करण्यात आले होते. त्याच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव होत होता. रुग्णाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करूनही तो वाचू शकला नाही. त्यांना १८ सप्टेंबरला मेंदूमृत घोषित करण्यात आले. समुपदेशनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. रुग्णाच्या कुटुंबाकडून संमती मिळाल्यावर यकृत, दोन मूत्रपिंडे आणि दोन नेत्रपटल दान करण्यात आले. डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एका ५५ वर्षीय रुग्णाला यकृत आणि ३३ वर्षीय रुग्णाला एक मूत्रपिंड प्रत्यारोपित करण्यात आले. दुसरे मूत्रपिंड पुण्यातील एका रुग्णालयातील रुग्णाला देण्यात आले. याचबरोबर गरजूंसाठी नेत्रपटल दान करण्यात आले.
आणखी वाचा-पिंपरी-चिंचवडमध्ये संततधार; पवना धरण १०० टक्के भरले
याबाबत डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या (अभिमत विद्यापीठ) प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पी. पाटील म्हणाल्या की, अवयव दान आणि प्रत्यारोपण हे जीव वाचवण्याचा शेवटचा उपाय आहेत. अवयव दान आणि प्रत्यारोपणाच्या माध्यमातून जीवन वाचवणाऱ्या आमच्या डॉक्टरांचा अभिमान आहे. अवयव दान आणि त्यामुळे वाचवता येणारे जीवन याबद्दल जागरूकता पसरवणे आमचे उद्दिष्ट आहे.
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 53 year old mans organ donation saved three lives pune print news stj 05 mrj