५८ वर्षीय भाजी विक्रेत्याची आत्महत्या

आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही

पिंपरी चिंचवड येथील मोशीमध्ये एका ५८ वर्षीय भाजी विक्रेत्याने घरातील झोपाळ्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. दादाजी दामोदर खैरनार असं या व्यावसायिकाचं नाव आहे. मध्यरात्री त्यांचा मुलगा जेव्हा कामावरून घरी आला तेव्हा ही घटना उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादाजी दामोदर खैरनार (वय ५८ मूळ जळगाव) यांनी मध्यरात्री घरातील झोपाळ्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. दादाजी आणि त्यांची पत्नी हे मुलाकडे रहात असून त्यांचे एकत्र कुटुंब आहे. दोन मुलं आणि त्यांची पत्नी हे देखील सोबत राहतात. रात्री उशिरा जेवण केल्यानंतर सर्व आपापल्या खोलीत झोपले.मध्य रात्री चालक म्हणून काम करत असलेला त्यांचा मुलगा घरी आला तेव्हा वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर दिसले.अद्याप दादाजी यांनी आत्महत्या का केली हे समजू शकलेले नाही.ते भाजीचा व्यवसाय करत होते. या प्रकरणी पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 58 year old vegetable seller commits suicide in pimpri