पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ४३ जणांची पाच कोटी ९६ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या एकाला हडपसर पोलिसांनी अटक केली.प्रतीक कुमार चौखंडे (वय ३६, रा. स्वप्नलोक सोसायटी, फुरसुंगी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. चौखंडे हा हडपसर भागातील ससाणेनगर परिसरात शेअर बाजार गुंतवणूक मार्गदर्शन वर्ग चालवायचा. शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून चौखंडेने एका तक्रारदाराकडून २५ लाख रुपये घेतले. सुरवातीला त्याला परतावा दिला. मात्र, गेल्या महिन्यापासून त्याने परतावा देणे बंद केले. तक्रारादारने चैाखंडेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही. चौकशीत त्याने तक्रारदारासह ४३ जणांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in