scorecardresearch

पुणे : हस्ताक्षर चांगले नसल्याने शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला मारहाण; शिक्षिकेच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद

या प्रकरणी वानवडी पोलिसांनी शिक्षिकेच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

पुणे : हस्ताक्षर चांगले नसल्याने शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला मारहाण; शिक्षिकेच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद
प्रतिनिधिक छायाचित्र photo source : indian express file photo

हस्ताक्षर चांगले नसल्याने विद्यार्थ्याला शिक्षिकेने मारहाण केल्याची घटना वानवडी भागातील एका शाळेत घडली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी शिक्षिकेच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिलेचा सहा वर्षांचा मुलगा लुल्लानगर परिसरातील एका शाळेत शिक्षण घेत आहे.

हस्ताक्षर चांगले नसल्याने शिक्षिकेने विद्यार्थ्याला मारहाण केली. त्याला वर्गात बसण्यास मनाई करून घरी जाण्यास सांगितले. मारहाणीचा प्रकार कुटुंबीयांना सांगितल्यास तुला अजून मारेल, अशी धमकी शिक्षिकेने दिल्याची तक्रार मुलाच्या आईने पोलिसांकडे दिली. त्यानंतर पोलिसांनी ३५ वर्षीय शिक्षिकेच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस हवालदार ठाकरे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 12:24 IST

संबंधित बातम्या