पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १२८ जागांपैकी ६४ नवे चेहरे निवडून आले आहेत. ६४ जुने नगरसेवक पुन्हा सभागृहात निवडून आले आहेत. त्यामध्ये भाजपचे ४३, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे १७, शिवसेना (शिंदे) पक्षाच्या चार जणांना जनतेने पहिल्यांदाच संधी दिली आहे.
भाजपचे साेनम माेरे, सुजाता बाेराटे, निखिल बाे-हाडे, सारिका गायकवाड, अर्चना सस्ते, सचिन तापकीर, श्रुती डाेळस, उदय गायकवाड, कृष्णा सुरकुले, कविता भाेंगाळे, रेखा देवकर, राजश्री लांडगे, याेगेश लांडगे, राणी पठारे, सुहास कांबळे, सुप्रिया चांदगुडे, कुशाग्र कदम, रिटा सानप, नीलेश नेवाळे, शितल वर्णेकर, शिवानी नरळे, अनिल घाेलप, अर्चना करांडे, कैलास कुटे, धर्मपाल तंतरपाळे, पल्लवी वाल्हेकर, मनिषा चिंचवडे, मधुरा शिंदे, मंदार देशपांडे, काेमल काळे, तानाजी बारणे, कुणाल वाव्हळकर, रेश्मा भुजबळ, श्रृती वाकडकर, स्नेहा कलाटे, अर्चना तापकीर, अनिता काटे, कुंदा भिसे, रविना आगाेळकर, श्याम जगताप, ज्ञानेश्वर जगताप, पल्लवी जगताप, तृप्ती कांबळे हे पहिल्यांदाच निवडून आले आहेत.
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे (अजित पवार) विकास साने, यश साने, विराज लांडे, अश्विनी वाबळे, तुषार सहाने, सिद्धार्थ बनसाेडे, सारिका मासुळकर, अरुणा लंगाेटे, शेखर चिंचवडे, मनीषा लांडे, वर्षा जगताप, प्रियांका कुदळे, सागर काेकणे, याेगिता बारणे, प्रतीक्षा लांघी, दीप्ती कांबळे, उज्जवला ढाेरे आणि शिवसेना शिंदे गटाचे ऐश्वर्या तरस, रेश्मा कातळे, नीलेश तरस, विश्वजीत बारणे यांना पहिल्यांदाच नगरसेवक हाेण्याची संधी मिळाली.
२७ माजी नगरसेवकांचा पराभव
महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत विजयी झालेल्या २७ नगरसेवकांचा पराभव झाला. त्यामध्ये अश्विनी जाधव, वसंत बाेराटे, अनुराधा गाेफणे, प्रियांका बारसे, संताेष लाेंढे, सीमा सावळे, विलास मडिगेरी, सचिन चिखले, मीनल यादव, माेरेश्वर भाेंडवे, नामदेव ढाके, सचिन चिंचवडे, अश्विनी चिंचवडे, माेरेश्वर शेडगे, जयश्री गावडे, सुजाता पालांडे, सुलक्षणा धर, उषा वाघेरे, उषा काळे, मयुर कलाटे, रेखा दर्शिले, तुषार कामठे, चंद्रकांत नखाते, शितल काटे, उषा मुंढे, राेहित काटे, उषा ढाेरे या २७ माजी नगरसेवकांचा पराभव झाला.
या ६४ माजी नगरसेवकांचा पुन्हा प्रवेश
संगिता ताम्हाणे, सारिका बाेराडे, राहुल जाधव, नितीन काळजे, हिराबाई घुले, भिमाबाई फुगे, सागर गवळी, जालिंदर शिंदे, रवि लांडगे, साेनाली गव्हाणे, नितीन लांडगे, नम्रता लाेंढे, वैशाली घाेडेकर, राहूल भाेसले, अनुराधा गाेरखे, तुषार हिंगे, कुंदन गायकवाड, याेगिता नागरगाेजे, प्रविण भालेकर, पंकज भालेकर, सुलभा उबाळे, उत्तम केंदळे, वैशाली काळभाेर, प्रमाेद कुठे, शरद मिसाळ, शैलजा माेरे, शर्मिला बाबर, अमित गावडे, आशा सुर्यवंशी, भाऊसाहेब भाेईर, अपर्णा डाेके, अनंत काे-हाळे, सुरेश भाेईर, शितल शिंदे, सविता आसवाणी, जितेंद्र ननावरे, याेगेश बहल, निकिता कदम, संदीप वाघेरे, डब्बू आसवाणी, निता पाडाळे, विनाेद नढे, संताेष काेकणे, मनिषा पवार, अभिषेक बारणे, माया बारणे, निलेश बारणे, राहुल कलाटे, विनायक गायकवाड, आरती चाेंधे, संदिप कस्पटे, बाबा त्रिभुवन, सविता खुळे, शत्रुघ्न काटे, विठ्ठल काटे, शकुंतला धराडे, शशिकांत कदम, राजू बनसाेडे, स्वाती काटे, संजय काटे, नवनाथ जगताप, हर्षल ढाेरे आणि प्रशांत शिताेळे या ६४ माजी नगरसेवकांनी मतदारांनी पुन्हा एकदा संधी दिली आहे.
