पुण्यातील हिंजवडीत वऱ्हाडी बनून लग्न समारंभात आलेल्या चोरट्यांनी ६५ तोळे सोन्याचे दागिने, ९ लाख रुपये रोख रक्कम घेऊन पोबारा केला होता. ही घटना एका नामांकित हॉटेलमध्ये घडली होती. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी मोठ्या शिताफीने मध्यप्रदेशमधील कडीयासांसी या गावात जाऊन ६५ पैकी ५३ तोळे सोन्याचे दागिने परत आणले आहेत.

हेही वाचा- राज्य गारठले; उत्तर महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा

farmer near chakan planted 66 cannabis plants in corn field
पिंपरी : चाकणमध्ये मक्याच्या शेतात गांजा
three thousand families staying near waldhuni river boycotting lok sabha election, construction within river bed
कल्याणमध्ये वालधुनी नदी परिसरातील तीन हजार कुटुंबीयांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
chhota rajan marathi news, 213 burglary marathi news
कुख्यात डॉन छोटा राजनच्या घरासह, २१३ घरफोड्या करणाऱ्यास अटक
College Girl Murdered by Friends for Ransom
धक्कादायक : विमाननगर भागातून अपहरण झालेल्या महाविद्यालयीन तरुणीचा मित्राकडूनच खंडणीसाठी खून

कडीयासांसी या गावात बहुतांश नागरिक चोरीच करतात. अशा ठिकाणी जाण पोलिसांच्या जीवावर देखील बेतू शकलं असत तरी देखील मध्यप्रदेश बोडा पोलीस आणि हिंजवडी पोलिसांची टीम त्या गावात गेली तिथं जमाव जमला होता. पोलिस आणि तेथील नागरिक आमनेसामने आले होते. स्वतःच्या बचावासाठी स्थानिक पोलिसांनी हवेत गोळीबार केला. अशा स्थितीत त्या गावातून ५३ तोळे सोन्याचे दागिने परत आणण्यात पोलिसांना यश आले आहे. मुख्य चोरटे मात्र पसार झाले आहेत. रितीक महेश सिसोदिया, वरून राजकुमार सिसोदिया, शालू रगडो धपाणी आणि श्याम लक्ष्मण सिसोदिया अशी मुख्य आरोपींची नाव आहेत. 

हेही वाचा- पुणे : नऊ वर्षांतील ३४५९ बाळांचं जन्मस्थान मुक्काम पोस्ट ‘१०८ रुग्णवाहिका’! २०२२ मध्ये १२४ बाळांचा जन्म रुग्णवाहिकेत!

६ डिसेंबर २०२२ रोजी पुण्याच्या हिंजवडी हद्दीत एका नामांकित हॉटेल मध्ये लग्न समारंभ सुरू होता. त्या लग्नात वऱ्हाडी बनून दोन चोरट्यांनी प्रवेश केला. अगदी ड्रेस कोड आणि भाषा त्याच समाजाची बोलल्याने ते चोर आहेत की वऱ्हाडी हे कोणालाच समजलं नाही. चोरट्यांनी वधू मुलीच्या आईच्या हालचालीवर बारीक नजर ठेवली आणि काही सेकंदात ६५ तोळे सोन्याचे दागिने आणि ९ लाख रुपये रोख रक्कम असलेली पर्स घेऊन चोरटे पसार झाले. सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जास्त असल्याने काही मिनिटात त्या समारंभात गोंधळ उडाला. हिंजवडी पोलीस तात्काळ घटनस्थळी पोहचले. सीसीटीव्हीद्वारे तपास केल्यानंतर ते चोरटे मध्यप्रदेश येथील असल्याचं गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.

हेही वाचा-  पुण्यात कोयता गँगचा कहर, कोंढव्यामध्ये दहशत; पाच वाहनांची तोडफोड

वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर काटे आणि राम गोमारे यांनी तपास सुरू केला. गोमारे यांची टीम मध्यप्रदेशमध्ये पोहचली. चोरटे निष्पन्न झाले होते. मात्र, कडीयासांसी या गावात जायचं धाडस कोणी करत नव्हतं. कारण, त्या गावात चोरी करणाऱ्यांची संख्य जास्त आहे. त्या गावात पोलिस किंवा अनोळखी व्यक्तीने प्रवेश केल्यास त्या व्यक्तीला बेदम मारहाण केली जाते. वेळ पडल्यास गोळीबार ही केला जातो. त्यामुळ राम गोमारे यांच्या टीमने अवधी घेतला १७ दिवसांचा मुक्काम त्या परिसरात केला. स्थानिक बोडा पोलिसांची मदत घेऊन हिंजवडी पोलीस त्या गावात पोहचले काही मिनिटात च मोठा जमाव तिथं जमला पोलिसांना घेरण्यात आलं. पोलीस आणि नागरिक आमनेसामने आले होते. स्थानिक पोलिसांनी त्या जमावाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर त्यांना हवेत गोळीबार करावा लागला. जमाव पांगल्यानंतर पोलिसांनी त्या चोरट्याच्या घरातून ५३ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. चोरटे मात्र पसार झाले असून ५३ तोळे सोन्याचे दागिने परत आणण्यात पोलिसांना यश आले आहे. चोरट्यांना पकडण्याच मोठा आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलिस कर्मचारी कैलास केंगले, विक्रम कुदळे, अरुण नरळे, सागर पंडित यांचा सहभाग देखील या कामगिरीत होता.