scorecardresearch

पुणे : स्वस्तात शेतजमीन देण्याच्या आमिषाने सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्तांची ६६ लाखांची फसवणूक

भोर तालुक्यात स्वस्तात शेतजमीन विकत घेऊन देण्याच्या आमिषाने सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याची ६० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

fraud with retired Police officer pune
स्वस्तात शेतजमीन देण्याच्या आमिषाने सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्तांची ६६ लाखांची फसवणूक (प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात स्वस्तात शेतजमीन विकत घेऊन देण्याच्या आमिषाने सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याची ६० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी राजेश अंकुश पोटे, संदेश अंकुश पोटे, प्रियंका निलेश सूर्यवंशी (सर्व रा. वडगाव बुद्रुक) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा – …अन् लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांना अश्रू अनावर झाले!

हेही वाचा – पुणे : सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर दुचाकी लावण्याच्या वादातून तरुणावर शस्त्राने वार; नाना पेठेतील घटना

तक्रारदार गणेशखिंड रस्त्यावरील भोसलेनगर परिसरात राहायला आहेत. तक्रारदार निवृत्त सहायक पोलीस आयुक्त आहेत. त्यांची आरोपींशी ओळख झाली होती. भोर तालुक्यात शेतजमीन विक्रीस आहे. स्वस्तात शेतजमीन मिळवून देतो, असे आमिष आरोपींनी त्यांना दाखविले होते. त्यानंतर त्यांनी आरोपींना शेतजमीन खरेदीसाठी ६० लाख रुपये दिले. पण आरोपींनी त्यांना शेतजमीन मिळवून दिली नाही. त्यामुळे निवृत्त सहायक पोलीस आयुक्तांनी आरोपींना जाब विचारून पैसे परत करण्याची मागणी केली. आरोपींनी त्यांना धमकावले. आर्थिक नुकसान करण्याची धमकी देऊन सहा लाख रुपये उकळले. त्यानंतर आरोपींकडून धमकावण्याचे प्रकार सुरू होते. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 15:34 IST

संबंधित बातम्या