मुलीची तब्बेत बरी नसल्याने घटना आली समोर
पिंपरी-चिंचवाडमध्ये ६७ वर्षीय व्यक्तीने पाच वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीला दिघी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना २१ तारखेला घडली असून पीडित मुलीची तब्बेत बरी नसल्याने दवाखान्यात घेऊन जाण्यात आलं, तेव्हा धक्कादायक घटना उघड झाली आहे.




पिंपरी-चिंचवड शहरातील दिघी परिसरात ६७ वर्षीय व्यक्तीने ५ वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. २१ तारखेला पीडित मुलीला आरोपी हा गोठ्यात घेऊन गेला तिथे चिमुरडीवर अत्याचार केला अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवशी पीडित मुलीची तब्बेत बरी नसल्याने तिला दवाखान्यात घेऊन जाण्यात आलं, तिथं डॉक्टरांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं तिच्या आई ला सांगितलं. आरोपी हा शेजारीच राहण्यास असून मुलीला विश्वासात घेऊन विचारलं असत ६७ वर्षीय आरोपी निष्पन्न झाला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे अशी माहिती दिघी पोलिसांनी दिली आहे.